*@ABHIJEETRANE(AR)*
धनंजय मुंडे ओबीसी नेते असल्यामुळे, मराठा वर्चस्वाचा आरोप होणा-या, राष्ट्रवादी नेत्यांना, ओबीसींमधील प्रतिक्रिया लक्षात घेऊन, जपून पावले टाकावी लागत आहेत, असे वाटते.
अन्यथा खाजगीत, राष्ट्रवादी नेते, "धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला पाहिजे" असेच म्हणतात.
अजित पवार यांच्यासोबत, धनंजय मुंडे फडणवीसांच्या बाजूने, 80 तासांच्या सत्तानाट्यात होते, त्यामुळे शरद पवार साहेबांना, मुंडे यांच्याबद्दल, सहानुभूती असणार नाही.
पण "पुतण्या अजितदादांना माफ केले, मात्र संधी मिळताच, मुंडे यांचा काटा काढला", असा आरोप होऊ नये, याची काळजी, पवार साहेब घेत असावेत.
विरोधी पक्ष, मिडीया आणि लोकांमधून, मुंडे इतके बदनाम होण्याची वाट, कदाचित पवार साहेब बघतील, की धनंजय मुंडे हा विषय, कायमचाच संपेल.
बाय दि वे :
धनंजय मुंडे यांची जागा घेण्यासाठी पंकजा मुंडे राष्ट्रवादीत गेल्या / नेल्या गेल्या तर आश्चर्य नाही!!
◆
*@ABHIJEETRANE(AR)*
सकृतदर्शनी जावयाला ड्रग प्रकरणात अटक झाली म्हणून नवाब मलिक यांना राजीनामा देण्याची गरज दिसत नाही. ते देणारही नाहीत. राष्ट्रवादी मागणार नाही. राजकीय नेत्यांच्या नातेवाईकांकडून झालेल्या चुका किंवा अपराध यांना त्या नेत्याने प्रोत्साहन किंवा संरक्षण दिलेले नसेल तर नेत्याला दोष देण्यात अर्थ नाही. त्या अर्थाने नवाब मलिक निर्दोष दिसतात मग राजीनामा कशासाठी ?
◆
*@ABHIJEETRANE(AR)*
ग्रामपंचायत निवडणुकीत पक्षीय पातळीवर निवडणुका लढवल्या जात नाहीत पण निवडून आल्यानंतर पंच, सरपंच आपला कल कोणत्या पक्षाकडे आहे हे ऑफ दि रेकॉर्ड जाहीर करतात. मग राजकीय पक्ष आमचा पक्ष इतक्या ग्रामपंचायतीत निवडून आला वगैरे दावा करतात. माझा अंदाज असा आहे की 'सुमारे साठ टक्के ग्रामपंचायती आपणच जिंकल्याचा दावा महाआघाडीतील घटक पक्ष आणि भाजपा असे दोघेही करतील पण प्रत्यक्षात महाआघाडीतील तीन घटक पक्षांकडे भाजपाच्या तुलनेत अधिक ग्रामपंचायती असतील.. सुमारे 70% ! 10/20% ग्रामपंचायतीतील पंच व सरपंच आपण कोणत्याच राजकीय पक्षाशी संबंधित नसल्याचे जाहीर करतील अशी शक्यता आहे. आठवड्यानंतर ग्रामपंचायतीतील पक्षीय बलाबल सिद्ध होईल.
Comments