*ABHIJEET RANE (AR)*
मुंबई शहरात अतिवृष्टीने होणारे खड्डे बुजवा आणि धोकादायक ईमारती रिकाम्या करून घेण्याचे फर्मान मनपाने सोडले. एकवेळ कागदोपत्री हेराफेरी करून खड्डे बुजवले जातील पण धोकादायक ईमारतीतील रहिवाशांना पर्यायी जागा जवळपांसच्या विभागात आहेत का?
◆
*ABHIJEET RANE (AR)*
आरेमध्ये मेट्रो कारशेड उभारण्यासाठी सरकार कठोर पावले उचलणार असल्याचे संकेत मिळाल्याने ठाकरे-पितापुत्रांना शक्ती पणला लावता येणार नाही.आता त्यांना अजित पवारांच्या कारशेडची किंमत वाढेल ह्या विधानाची पळवाट स्विकारणे भाग पडेल.
◆
*ABHIJEET RANE (AR)*
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ह्यांच्यात कॅबिनेट बैठक होऊन त्यात काही निर्णय घेण्यात आले. परंतु आवश्यक ती गणसंख्या ह्या बैठकीला नसल्याने कायदेशीर आधारावर हे निर्णय टिकण्याची शक्यताच कमी परंतु हे सरकार म्हणून समजणे आवश्यक आहे.
◆
*ABHIJEET RANE (AR)*
शिवाजी पार्क मैदानात फक्त मातीचा भराव टाकण्यासाठी मनपाने कोट्यावधी रूपये खर्च केले .त्यांस मनसे व शिवाजी पार्कातील पर्यावरण प्रेमींनी आक्षेप घेत चौकशी मागितली. ती झाली तर ठीक पण मनपातील सर्व कारभार स्वच्छच अशी प्रथा आहे त्यांस कोण करणार?
◆
*ABHIJEET RANE (AR)*
भाजपने उध्दव ठाकरेंना राजकीय पटलावर एकाकी पाडल्यामुळे मुंबईतही ठाकरेंच्या मातोश्रीचे वजन घटत आहे.ठाकरे पिता-पुत्र नव्याने शिवसेना उभारणींस झटताहेत. परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व केद्रींय मंत्री नारायण राणे त्यांचे हे प्रयत्न यशस्वी होऊ देतील का?
◆
*ABHIJEET RANE (AR)*
सिने अभिनेत्री सुश्मिता सेन व उद्योगपती ललित मोदीं लग्नबंधनात अडकण्याची बातमी झळकतांच समाजमाध्यमांतून जळफळांट दिसला.साठीच्या जवळपांस असताना मोदींना हा निर्णय घेतला असल्याने माध्यमांना मिया बिवी राजी तो क्यां करे काझी हे समजणार कोण?
Comentarios