top of page
dhadakkamgarunion0

desk of abhijeet rane

*ABHIJEET RANE (AR)*

स्वातंत्र्यदिनी राज्यात ध्वजारोहणासाठी पालकमंत्री व अधिकाऱ्यांच्या नियुक्तीची यादी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून जाहीर केली.त्यामुळे राज्यभर ७५ वा स्वातंत्र्यदिन अधिक आनंद व उत्साहाने साजरा करायला आबालवृध्दांसह सर्वचजण आतुरले आहेत.


*ABHIJEET RANE (AR)*

राज्यभरांत नारळी पोर्णिमा व रक्षांबंधन हा सण आनंददायी व उत्साही वातावरणांत जल्लोषात साजरा झाला.पण त्यासाठी पोलिसांनी अपार कष्ट घेतले.त्यांनी संवेदनशील भागांसह सर्वत्र चोख बंदोबस्त ठेवला होता.त्यामुळे सणावाराची मजा लुटणे सगळ्यांना शक्य झाले.

*ABHIJEET RANE (AR)*

जालन्यातील स्टिल कारखानदार, कपडे व्यापारी व रिअल इस्टेट डेव्हलपरकडे ३९० कोटींचे घबाड सापडल्याने आयकर अधिकाऱ्यांचे डोळे पांढरे झाले. डझनभर मशिनच्या मदतीने फक्त रोकड मोजण्यास तेरा तांस लागले.त्यावेळी त्यांना अर्पिता मुखर्जीकडील धाडीचेही स्मरण झाले.


*ABHIJEET RANE (AR)*

जालन्यातील व्यापाऱ्यासारखेच घबाड मुंबई-ठाण्यातही सापडेल पण गुप्तचरांना बाहेरील माहिती ठेवण्यात रस व वेळही नाही. वरिष्ठ अधिकारी त्यांना राजकारणांत कोण,कोणाचे,काय चावतयं? ह्याकामी जु़ंपतात.मग बाकींच्याकडे ते कसे लक्ष देणार?

*ABHIJEET RANE (AR)*

धनष्यबाण चिन्हांसाठी केंद्री़ंय निवडणूक आयोगाने १५ दिवसांची मुदत शिवसेनेला दिली. शिवसेनेने चार आठवड्यांच्या मागितलेल्या मुदतीनंतरही निवडणूक आयोगाने असे का केले?हा प्रश्न ते करताहेत.पण त्यांचा हा लढा दिवसेंदिवस रोचक व रंगतदार होतो आहे.

*ABHIJEET RANE (AR)*

विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेतेपद न मिळाल्याने काँग्रेस नाराजीचे वृत्त थडकले. पण त्याची दखल घेण्यात अर्थ नाही. एक म्हणजे मविआ सत्तेत नाही आणि काँग्रेसकडे नेतृत्वाचा अभाव तर शिवसेनेत उभी फूट. त्यामुळे त्यांच्यातच राम उरला नाही. फक्त अवलंबून आहे ते एनसीपीवर.

4 views0 comments

Kommentare


bottom of page