top of page
dhadakkamgarunion0

desk of abhijeet rane

*ABHIJEET RANE (AR)*

आदित्य ठाकरेंनी एका समारंभात त्यांचे पिता मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंची कार्यशैली उत्तम प्रकारे मांडले. त्यामुळे त्यांचे विशेष कौतुक व्हायला हवे.ठाकरें घराण्यात शिवसेनाप्रमुखांनंतर त्यांच्या ह्या नातवाने पित्याचे शिवधन्युष्य तरूण वयातच आपल्या खाद्यांवर पेललं.


 

*ABHIJEET RANE (AR)*

पुण्यात आज शिवसेनचे बंडखोर नेते एकनाथ शिंदेंना शिवसैनिकांकडून रस्त्यावर जोडे मारण्यात आले.कालपर्यंत शिंदेनाच नेते मानणाऱ्या ह्या शिवसैनिकांचा सत्कारच करायला हवा. काल वंदन करून शिंदेंना हार घातला गेला त्यानंतर एका रात्रीत शिंदेच खलनायक.

 

*ABHIJEET RANE (AR)*

नागपूरात एकनाथ शिंदेविरोधात मोजक्या शिवसैनिकांनी मोर्चा काढला. त्यांनी शिंदेसमर्थनार्थ एक बॅनर लागले ते फाडण्यात आले असे सांगून ह्यापुढे अशी कृती घडल्यास गद्दारांना धडा शिकवण्याची दर्पोक्ती केली.विशेष म्हणजे नागपुरातील शिवसैनिकांची शक्ती किती?

 

*ABHIJEET RANE (AR)*

संजय राऊत गरजताहेत आहेत की बरसताहेत तेच स्पष्ट होत नाही.बंडखोर आमदारांनी उध्दव ठाकरेंना भेटावं असे राऊंत म्हणतांत नंतर त्यांनी मुंबईत येण्याची हिंम्मत करून दाखवावी अशी पुस्ती जोडतांत. ह्यावरून राऊतांनाच आपल्या विधानांचे भान नसल्याचे दिसते.


 

*ABHIJEET RANE (AR)*

बंडखोर आमदारांमुळे शिवसेनेत उभी फूट पडली. त्यामागे भाजपा आहे हे देवेंद्र फडणवीसांच्या दिल्लीवाऱ्यांवरून स्पष्ट झाले आहे. परंतु लगेच भाजपा धावपळ करून आत्मघांत करणार नाही तर ते अजून चार-पाच दिवस धीमी पाऊले टाकतील.

 

*ABHIJEET RANE (AR)*

गेल्या काही दिवसांत बंडखोर एकनाथ शिंदेंचे धिंडवडे शिवसैनिकांनी काढले.त्यावरून उद्या त्यांना घरवापसी करताना अडचणच. आज त्यांना गद्दार ठरवून जोडे मारणारा शिवसैनिक भविष्यात शिंदेंकडे मदत मागायला जाईल तेव्हा हाच तो जोडे मारणारा हि वेदना त्यांना होणारच.

2 views0 comments

Comments


bottom of page