*@ABHIJEETRANE (AR)*
"सोशल डिस्टन्सींगचा फज्जा" अशा विघ्नसंतोषी आणि भक्त - भाविकांवर निर्दय कारवाई करण्यासाठी पोलिसांना चिथावणी देणा-या मराठी न्यूज चॅनल्सवर लोकांनी बहिष्कार टाकावा ही "भक्त पंचायत' या संघटनेने केलेली सूचना योग्य आहे असे मला वाटते ! लाॅकडाऊनच्या नावाखाली सक्ती केली गेली, पोलिसांनी बळाचा निर्दयपणे वापर केला यालाही न्यूज चॅनल्सनी कारवाई साठी निर्माण केलेला अतिरेकी दबाव कारणीभूत होता.
www.abhijeetrane.in
*@ABHIJEETRANE (AR)*
मंदिरे उघडली. दर्शनासाठी आलेल्या प्रत्येक भक्ताची दर्शन घेताना एकच प्रतिक्रीया असणार की केवळ केवळ केवळ फक्त फक्त फक्त महाआघाडी सरकारच्या डरपोक, सर्व-धर्म-द्रोही, देव-दैवतांची अवमानना करणा-या धोरणामुळे आम्ही दर्शनापासून वंचित राहिलो. दर्शनासाठी मंदिरांचे दरवाजे सरकारने नाईलाजाने खुले केले आहेत. जर भाजपाने उग्र आणि व्यापक आंदोलन केले नसते तर जानेवारी पर्यंत मंदिरे उघडली नसती. मला भीती वाटत होती तशा बातम्या येऊ लागल्या आहेत. आत्ता न्यूज चॅनल्सवर पोलिसांनी दर्शनासाठी जमलेल्या भाविकांवर लाठीमार केल्याची बातमी दाखवत आहेत. पोलिसांना संयम आणि भाविकांच्या भावना समजून घेत बळाचा निर्दयपणे वापर करू नये असे आदेश गृहमंत्री अनिल देशमुख यांनी द्यायला हवेत.
www.abhijeetrane.in
*@ABHIJEETRANE (AR)*
दिवाळी आली आणि ज्याने त्याने आपापल्या परिस्थिती आणि मनःस्थिती नुसार साजरी केली. मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छांचे आदानप्रदान झाले. पण 'पुढे काय?" या प्रश्नाचे उत्तर कोणाकडे नाही. कोरोना पुन्हा येणार काय? लस येणार कधी, ती खरेच प्रतिबंधक उपाय ठरणार का? माझ्यापर्यंत ती लस कधी पोचणार? ज्यांच्या नोक-या, रोजगार, उद्योग, धंदे, व्यापार, व्यवसाय गेले ते पुन्हा प्राप्त होणार काय? महाराष्ट्रातील महाआघाडी सरकार जनसामान्यांची आर्थिक कोंडी करण्यासाठी सतत कठोर कारवाया करीत असते, लाॅकडाऊन पुन्हा लादण्याच्या धमक्या देत असते तशा त्या खरोखरच अंमलात येतील की काय? ह्या आणि इतर अनेक प्रश्नांची उत्तरे ठाऊक नसताना नववर्षाच्या शुभेच्छा ही केवळ एक औपचारिकता आहे असे मला वाटते.. तरीही ती पुरी करावी लागली.. मला आणि तुम्हालाही .. !!
www.abhijeetrane.in
*@ABHIJEETRANE (AR)*
हिदू-हुदय सम्राटांच्या आठव्या स्मृती दिना निमित्त त्यांना अभिवादन करताना मुख्यमंत्री उद्धवजींनी आपण बाळासाहेबांच्या कोणत्या आदेश संदेश उपदेश आचार विचार यांचे पालन पालन पालन करतो आहोत आणि कोणत्या संदर्भात प्रतारणा प्रतारणा प्रतारणा करतो आहोत याचा अंतर्मुख होऊन विचार करावा ही इच्छा अपेक्षा विनंती.. ! निष्कर्ष जाहीर करण्याची गरज नाही पण पण पण निदान स्वतःमध्ये बाळासाहेबांचा वसा आणि वारसा आहे हे सिद्ध करण्यासाठी आवश्यक ते बदल जरूर घडवून आणावेत ही महाराष्ट्राची सार्वत्रिक भावना आहे ती मी व्यक्त केली आहे
www.abhijeetrane.in
*@ABHIJEETRANE (AR)*
बिहारमध्ये विधानसभा निवडणुका नंतरच्या पंचनाम्यात राहुल गांधी याना यथेच्छ बदनामीकारक दोष दिला जातो आहे पण पण पण माझ्या निरीक्षण परिक्षण सर्वेक्षण या नुसार राहुल गांधी हे स्वभाव रुची कार्यशैली लोकसंग्रह लोकानुनय लोकप्रियता या पैकी कोणत्याही निकषांवर कुठल्याही अर्थाने लोकनेते नाहीत नाहीत नाहीत !
ते दुर्दैवाने गांधी घराण्यात जन्माला आले म्हणून नाईलाजाने पद घेतात आणि संधी मिळताच किंवा ठपका बसताच पळ काढतात. काँग्रेसवाल्यांची पंचाईत अशी की "मॅडम' आजारी आणि "प्रिन्सेस'च्या नव-याला भस्म्या रोगाची बिमारी यामुळे राहुल गांधी नावाच्या पळपुट्या रडतराऊला बळेबळेच काँग्रेस अध्यक्षपदाच्या घोड्यावर बसवावे लागते आहे. थोडे दिवस जाऊ द्या. कितीही राज्यात पराभव होऊ द्या , शेवटी अध्यक्ष म्हणून राहुल गांधी काँग्रेसवाले बोडख्यावर बसवून घेणार यात शंकाच नाही. पण काँग्रेसवाले तरी काय करणार? काँग्रेस मध्ये पर्यायी नेता आहे कुठे ? 2024 च्या लोकसभा निवडणुकीत दारूण पराभव झाला की महाराष्ट्रातील काँग्रेसवाले राष्ट्रवादी किंवा भाजपा मध्ये जातील. इतर राज्यांत प्रादेशिक पक्ष किंवा भाजपा मध्ये जातील आणि अखिल भारतीय काँग्रेस मधील अखिल भारतीय हे दोन शब्द गळून पडतील.
www.abhijeetrane.in
*@ABHIJEETRANE (AR)*
राजू शेट्टी दाद देणार नाहीत हे ठाऊक असताना सदाभाऊ खोत यांनी शरणागती पत्करण्याची तयारी दाखवली यामुळे सदाभाऊ एक्स्पोझ तर झालेच पण राजकीय अधोगती आणि एक नेता म्हणून अवमूल्यन झाले ते वेगळेच. भाजपावर दबाव टाकण्यासाठी सदाभाऊंनी हे आत्मघातकी पाऊल उचलले असे काही दैनिकांनी लिहिले आहे. पण जोपर्यंत देवेंद्र फडणवीस यांच्या हाती महाराष्ट्रात भाजपाची सूत्रे आहेत तोपर्यंत कुणी नेता किंवा पक्ष यांचे पोलिटिकल बार्गेनिंग - सौदा - ब्लॅकमेल कदापिही कदापिही करू देणार नाहीत.. उलट लक्षात ठेवून योग्य वेळी कोंडीत पकडून उपद्रव आणि उपयुक्तता मूल्य कायमचे नष्ट करतात हा इतिहास आहे.
www.abhijeetrane.in
*@ABHIJEETRANE (AR)*
महाराष्ट्रात काँग्रेसला बाळासाहेब थोरात मंत्री होऊन वर्ष होत आले तरी नवा प्रदेशाध्यक्ष निवडता आलेला नाही.. याचा 50 % दोष गांधी घराण्याचा असला तरी 50% अपराध महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांचा आहे कारण आपल्यापैकी कुणाला प्रदेशाध्यक्ष करायचे या संदर्भात त्यांचे एकमत होऊ शकलेले नाही.
www.abhijeetrane.in
*@ABHIJEETRANE (AR)*
अर्नब गोस्वामी आणि रिया चक्रवर्ती या दोघांमध्ये शिकारी कोण? शिकार कोण? अखेर अखेर अखेर ठरले ?
www.abhijeetrane.in
*@ABHIJEETRANE (AR)*
थोडया दिवसांनी राजकीय नेता / मंत्री असून कोरोना झाला नाही हे डिसक्वालिफिकेशन ठरेल की काय? अशी शंका येते. ज्यांना कोरोना झाला ते नेते, मंत्री आणि त्यांचे फॅनॅटिक फाॅलोअर्स "साहेब लोकांमध्ये मिसळतात , लोकसेवा - कार्य करतात म्हणून त्यांना कोरोना झाला हे इतक्या अभिमानाने, गर्वाने आणि ज्यांना कोरोना झाला नाही ते नेते जणू लोकद्रोही, लोकविन्मुख आहेत अशा अभिनिवेशात सांगतात की सुरवातीला नेते आणि मंत्री कोरोना झाला हे सांगायला संकोच करीत होते आत्ता दिवस असे आले की "मला कोरोना झाला नाही " असे सांगताना नेत्यांना / मंत्र्यांना लाज वाटेल !!
www.abhijeetrane.in
Comments