*@ABHIJEETRANE(AR)*
दोन महिन्यांपूर्वी मी महाराष्ट्र मंत्री मंडळातील एका मंत्र्यांचे सेक्स स्कॅन्डल लवकरच हादरवून टाकणार आहे असा मेसेज केला होता ।
धनंजय मुंडे यांनी आता अर्ध सत्य कबूल केले आहे ।
उर्वरित सत्य कोर्टात उघड होईल ।
सामाजिक न्याय खात्याचा मंत्री अन्याय करतो आणि आधी लपविण्याचा मग दडपण्याचा प्रयत्न करतो आणि तरीही त्याचा राजीनामा राष्ट्रवादी काँग्रेस घेत नाही हे किळसवाणे लाजिरवाणे निषेधार्थ आहे ।
गोपीनाथ मुंडे यांच्यावर चारित्र्या बाबत अनेक आरोप वेळोवेळी झाले पण धनंजय मुंडे यांच्या बाबतीत तक्रारदार आहे ।
महाराष्ट्र मंत्रिमंडळात आणखी किमान चार मंत्री विवाह बाह्य संबंधांबाबत संशयाच्या भोवऱ्यात आहेत ।
आज ना उद्या त्यांचेही वस्त्रहरण अपेक्षित आहे ।
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि शरद पवार यांना अशा संशयास्पद चारित्र्याच्या मंत्र्यांना ठेवायचे की काढायचे या बाबतीत'धोरणात्मक' निर्णय घ्यावा लागेल ।
धनंजय मुंडे यांनी "शरद पवार यांनी सांगितले तर राजीनामा देऊ" अशी भूमिका घेऊन दस्तुरखुद्द पवार साहेबांना संकटात टाकले आहे ।
अर्थात विरोधी पक्षात देखील लाफडेबाज नेते आहेत फक्त सध्या ते 'छुपे रुस्तुम' आहेत ,उद्या त्यांचीही बिंगे फुटू शकतात ।
www.abhijeetrane.in
◆
🖋️ *@ABHIJEETRANE(AR)*
नामदार धनंजय मुंडे हे "अशा" संकटातून सहीसलामत कसे बाहेर पडायचे या साठी नामदार उदय सामंत यांचे मार्गदर्शन घेऊ शकतात .. उदय सामंत यांनी "अशाच" प्रकारच्या आरोपातून मोठ्या चातुर्याने मार्ग काढला होता !
www.abhijeetrane.in
◆
🖋️ *@ABHIJEETRANE(AR)*
मी कधीपासून सूचित करीत होतो तसा सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारच्या सोयीचा निर्णय शेतकरी आंदोलनाच्या संदर्भात दिला । आता पुढील टप्प्यात शेतकरी संघटनानी तज्ञ समितीशी चर्चा करण्यास नकार देणे अपेक्षित आहे । त्या नंतर शाहीनबाग प्रमाणे सर्वोच्च न्यायालय आंदोलकांना रस्त्यावरुन हटवण्याचा आदेश देईल आणि ऐकले नाही तर न्यायालयाचा अवमान ठरवून कारवाईचा आदेश जारी करील । माझ्या माहितीनुसार शेतकरी संघटनेचे नेते फुटतील । काही तडजोड करतील । काही वश तर काही माघारीसाठी विवश होतील । शक्यता आहे की पंजाब मध्ये सशस्त्र खलिस्तान चळवळ पुन्हा एकदा शेतकरी आंदोलनाच्या माध्यमातून सुरू होईल । सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे शेतकरी संघटनेचे नेते अधिक चवताळतील पण सरकारची कोंडीतून सुटका झाली आहे तर शेतकरी आंदोलन कोंडीत सापडले आहे । आंदोलनाने काहीही साध्य झालेले नसताना आंदोलन मागे घेतले तर जमलेले शेतकरी नेत्यांच्या जीवावर उठतील आणि मागे घेतले नाही तर आंदोलन हिंसक होत हाताबाहेर जाईल किंवा विस्कळीत होईल । 1980/81 च्या मुंबईतील दत्ता सामंत यांच्या गिरणी कामगारांच्या संपाबाबत असेच घडले आणि तो संप बारगळला । विजय मोदी सरकारचा होणार हे अटळ आहे !
www.abhijeetrane.in
◆
🖋️ *@ABHIJEETRANE(AR)*
"मला प्रदेशाध्यक्ष करा मी मंत्रिपदाचा राजीनामा देतो" असे विजय वादडेट्टीवार यांनी जाहीर केले आहे ।
मंत्रिपद सोडायला सहसा कुणी तयार नसते त्यामुळे ऑफर महत्वाची आहे ।
विजय वडेट्टीवार हे गरम डोक्याचे, तिखट जिभेचे , उतावळेपणा व आक्रमकपणा यामुळे इतर नेत्यांना स्वीकारार्ह नसलेले आहेत त्यामुळे त्यांनी तयारी दाखवली तरी इतर काँग्रेस नेते त्यांच्या नावाला संमती देतील असे वाटत नाही। कदाचित त्याचमुळे मंत्रिपद त्यागण्याची तयारी वडेट्टीवार यांनी दाखवली असावी । माझ्या अंदाजा प्रमाणे राजीव सातव किंवा नाना पटोले यांच्या पैकी एक प्रदेशाध्यक्ष होईल ।
www.abhijeetrane.in
◆
🖋️ *@ABHIJEETRANE(AR)*
महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्षपदी सौ. संध्या सव्वालाखे यांची नियुक्ती गांधी परिवाराने केली आहे । हे नाव पूर्वी कधी कुठे ऐकल्याचे आठवत नाही । मी काही काँग्रेस पक्ष नेत्यांना फ़ोन केले , त्यांनाही या कोण, कुठल्या ,काय पार्श्वभूमी आहे याची कल्पना नव्हती । याचा फायदा असा की पूर्वग्रहदूषित दृष्टीने त्यांच्या कडे पाहिले जाणार नाही । तोटा असा की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आणि नंतर मुदतपूर्व विधानसभा निवडणूक समोर असताना सिद्ध प्रसिद्ध महिला नेतेपदी असती तर प्रचार आणि तिकीट वाटपात महत्वाची भूमिका पार पाडली असती । प्रमुख महिला नेत्यांना डावलून संध्या सव्वालाखे या कोणाच्या शिफारसीने अध्यक्ष झाल्या हे कळले तर भावी काळात त्यांचे महत्व आणि भूमिका यांचा अंदाज येईल । या आधी कोण महिला काँग्रेस च्या अध्यक्षा होत्या हे तरी कधी जाणवले ? नावही आठवत नाही । तुलनेने राष्ट्रवादी आणि भाजपात महिला आघाडी ला महत्व देतात । शिवसेना महिला आघाडी च्या महाराष्ट्र अध्यक्षा तरी कुठे मीडियात दिसतात । संध्या ताई कोण हे ठाऊक नसले तरी शुभेच्छा द्यायला काय हरकत आहे ?
www.abhijeetrane.in
Comments