धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव अभिजीत राणे यांचे मोठे काका चंद्रमोहन राणे यांचे वृद्धापकाळाने राहत्या घरी 19 डिसेंबर रोजी निधन झाले होते.
आज प्रभू उपवन ब्रम्हाकुमारी येथे त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी शोकसभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी ब्रम्हाकुमारी उत्तर मुंबई, राजयोग केंद्रचे प्रमुख दिव्याबेन, वसई सेवा केंद्रच्या प्रफुल्लाबेन, भाईंदर सेवा केंद्रच्या भानूबेन, बोरिवली सेवा केंद्रच्या बिंदू बेन, कांदिवली सेवा केंद्रच्या राज बेन आदी मान्यवरांनी आपले अनेक वर्षांचे त्यांचे ब्रम्हाकुमारी सोबतचे अनुभव उपस्थितांसमोर मांडले.
अभिजीत राणे यांनी यावेळी शोकव्यक्त करताना, ब्रम्हाकुमारीच्या दिव्याबेन यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभले. माझे व काकांचे अतिशय जवळचे नाते होते. उतार वयात त्यांना सांभाळताना ब्रम्हाकुमारीच्या आदेशानुसारच आम्ही त्यांची सेवा करत असू, माझ्या परिवारासोबत माझ्या वर्तमानपत्राशी निगडित असलेले बी के पांडे यांनीही त्यांची खूप सेवा केली.
शोकसभेस चंद्रमोहन राणे यांचे लहान बंधू अशोक राणे, त्यांच्या वहिनी अनघा राणे, पुतण्या अमोल राणे, तसेच अभिजीत राणे यांच्या पत्नी साक्षी राणे चिरंजीव सोहम राणे व आप्तेषट तसेच परीवारिक संबंध असलेल्या अनेक महत्त्वच्या व्यक्तींनी शोकसभेस उपस्थित राहून स्वर्गीय चंद्रमोहन राणे यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून श्रद्धांजली वाहिली!
Comments