अभिजीत राणे लिहितात
‘कामातुराणां न भयम न लज्जा’ अशी संस्कृत म्हण उत्तर प्रदेशातील एका घटनाक्रमातून सिद्ध झाली आहे. कानपूरमध्ये रमजानच्या पवित्र महिन्यात एका मुस्लिम व्यावसायिकाचा 10 वर्षांचा मुलगा बेपत्ता झाला, जो इयत्ता पाचवीत शिकत होता. यामुळे मुस्लिम समाजातील लोक एकत्र आले, त्यांनी आंदोलन आणि रास्ता रोकोची धमकी दिली. पोलिसांनी कॉल रेकॉर्डिंगच्या आधारे अजहर अली या माणसाची चौकशी केली. पवित्र महिना सुरू असल्याने पत्नी शरीरसुख देत नव्हती आणि त्यामुळे कामवासना अनावर झाल्याने त्याने लहान मूळचे अपहरण करून त्याच्यावर अत्याचार केले. मुलगा आपले बिंग फोडेल याची भीती वाटल्याने मुलाचा खून केला. हे सत्य पोलिसांनी मुस्लिम समाजाला सांगितल्यावर आंदोलनाची धमकी देणारे मौलाना नरमले आणि आपल्याच धर्माचा गुन्हेगार आहे हे लक्षात आल्यावर त्यांनी यावर चर्चा करणार्या लोकांचा रोजा कबूल होणार नाही असा हास्यास्पद फतवा काढून प्रकरण झाकण्याचा अपयशी प्रयत्न केला.
अभिजीत राणे लिहितात
राहुल गांधी यांना संविधानाची प्रचंड काळजी आहे. ते सध्या लाल रंगाचे संविधान असे लिहिलेले पॉकेट बुक खिशात घालूनच फिरत असतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले संविधान भाजपा बदलणार आहे असा त्यांचा आरोप असतो. परंतु संविधानात आरोपीने न्यायालयाचा सन्मान करणे आणि कोर्टाने दिलेल्या तारखेला उपस्थित रहाणे आवश्यक असते याचा बहुदा त्यांना विसर पडला आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा सातत्याने माफीवीर आणि पेन्शनवीर असा उल्लेख केल्याने त्यांच्यावर महाराष्ट्रात रणजीत सावरकर यांनी खटला दाखल केला आहे. त्याच्या आजवरच्या एकाही सुनावणीला ते हजर राहिले नाहीत. न्यायालयाकडून विशेष सवलत घेऊन त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्स तंत्रज्ञान वापरुन उपस्थितीत नोंदवली आहे. याच गुन्ह्यासंदर्भात त्यांच्यावर लखनौ इथे सुद्धा एक खटला दाखल झाला आहे. या ठिकाणच्या सुनावणीला ते सातत्याने गैरहजर राहिल्याने शेवटी कोर्टाने त्यांना 200 रुपये दंड ठोठावला असून पुढील सुनावणीला गैरहजर राहिले तर वॉरंट निघेल असे न्यायालयाने राहुल गांधी यांच्या वकिलाला बजावले आहे. न्यायालयाचा सन्मान न करणारा हा कोंग्रेसी राजपुत्र सुधारणार का तुरुंगात जाणार हा औत्सुक्याचा विषय आहे.
अभिजीत राणे लिहितात
दिल्लीतील केजरीवाल सरकारचा दारू घोटाळा चर्चेत आहे. त्यावर कारवाई सुद्धा सुरू असतानाच आता मोहल्ला क्लिनिक घोटाळा समोर येतो आहे. दिल्ली हेल्थ मॉडेलचे सर्वेक्षण केल्यावर खालील धक्कादायक बाबी उघडकीस आल्या आहेत. क्लिनिकमध्ये बीपी मशीन, ऑक्सिमीटर किंवा थर्मामीटर देखील नाहीत. 41 दवाखाने महिन्यातून सरासरी 15-23 दिवस बंद होते कारण डॉक्टरच गायब होते. 74 दवाखान्यांमध्ये अत्यावश्यक सुविधा नाहीत.10 मध्ये बसण्याचीही व्यवस्था नाही, 21 मध्ये शौचालये नाहीत. 31 दवाखान्यात औषधांचा साठा नाही, साठा करायची व्यवस्थाच नाही. औषधे येत होती, पण साठा होत नसे. अर्थातच आलेली औषधे गायब होत होती. 150 पॉलीक्लिनिकपैकी 122 पॉलिक्लिनिक अस्तित्वातच नाहीत.केजरीवाल सरकारने नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांपैकी 23% डॉक्टर, 16% परिचारिका, 37% पॅरामेडिक बेपत्ता. थोडक्यात मोहल्ला क्लिनिक च्या नावाखाली भरपूर मोठा घोटाळा केला गेला असल्याचा संशय असून याची सुद्धा आता चौकशी सुरू होणार आहे.
अभिजीत राणे लिहितात
अखेरीस गंगेत घोडे न्हायले. कसबा विधानसभा पोट निवडणूक कोंग्रेस च्या तिकीटावर जिंकणारे आणि विधानसभा 2024 ला पराभूत झालेले कोंग्रेसी नेते रविंद्र धंगेकर यांनी अखेरीस कोंग्रेस पक्षाला जय महाराष्ट्र केला असून ते लवकरच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे सदस्य होणार आहेत. मूळचे मनसेचे असणारे धंगेकर आधी भाजपामध्ये प्रवेश मिळावा म्हणून उत्सुक होते. परंतु बापट साहेबांनी कधी त्याला संधी दिली नाही. नंतर ते कोंग्रेस मध्ये गेले आणि आममदारकी मिळाली. विधानसभा 2024 मध्ये झालेल्या पानिपतात त्यांची सुद्धा विकेट पडली. त्यानंतर ते अस्वस्थच होते. सत्ता नसेल तर कामे करता येत नाही ही त्यांची तडफड जाणवत होती. आजकालच्या राजकरणी मंडळींची सत्ता गेल्यावर होणारी अवस्था ही पाण्याबाहेर काढलेल्या माशाप्रमाणे होऊन जाते, ते सत्ता सुंदरीला प्राप्त करण्यासाठी आतूर झालेले असतात. मग वाट्टेल तश्या कोलांटया उड्या मारून त्याला नैतिकतेचा मुलामा चढवण्यात पण हे राजकरणी हुशार असतात. रविंद्र धंगेकर सुद्धा आता अशीच जनसेवेची मखलाशी करून शिंदे सेना निवासी होणार आहेत.
अभिजीत राणे लिहितात
आता खर्या अर्थाने मेट्रो सेवा पुण्यात सुरू झाल्याची भावना निर्माण झाली आहे. आज राष्ट्रवादी कोंग्रेस शरद पवार गटाने वाढती बेरोजगारी आणि महिलांवर होणारे अत्याचार या विरोधात आंदोलन केले होते. हे आंदोलन करताना समस्त आंदोलक मंडळी मेट्रोच्या रुळावर उभी राहून आंदोलन करू लागली. त्यामुळे मेट्रोसेवा विस्कळीत झाली. पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले. यातील दखलपात्र गोष्ट म्हणजे आजवर रास्ता रोको आंदोलन होत होते, रेल्वे रोको आंदोलन होत होते. आता या आंदोलकांना अजून एक नवीन , अभिनव स्थान प्राप्त झाले आहे. मेट्रो रोको आंदोलन. लोकशाही मध्ये नागरिकांना आपला निषेध नोंदवण्याचा अधिकार असतो. हा अधिकार बजावण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांचे जीवन वेठीला धरणे हा समस्त लोकशाहीप्रेमी , आंदोलनजीवी नागरिकांचा घटनादत्त अधिकार आहे. या अधिकाराचा वापर करण्यासाठी मेट्रो स्टेशन नावाची नवी जागा मिळवल्याबद्दल समस्त आंदोलनजीवी जनतेचे हार्दिक अभिनंदन.

Comments