🖋️ अभिजीत राणे लिहितात
- dhadakkamgarunion0
- Mar 17
- 4 min read
🖋️ अभिजीत राणे लिहितात
घुसखोरांना कायदेशीर वेसण घालण्याचा प्रयास महायुती सरकारने सुरू केला आहे. महाराष्ट्रात अवैधरित्या वास्तव्य करणार्या बांगलादेशी तसेच रोहिंग्या घुसखोरांविरोधात कठोर कारवाईसाठी ठोस उपाययोजना आखल्या असून, त्यामध्ये बोगस जन्म प्रमाणपत्र वापरणार्यां विरोधात फौजदारी कारवाईचा निर्णय महायुती सरकारने नुकताच जाहीर केला. त्यासाठी जन्म-मृत्यू नोंदणी नियमांमध्ये देखील बदल करण्यात आले आहेत.राज्यातील वाढत्या घुसखोरीच्या पार्श्वभूमीवर, बांगलादेशी तसेच रोहिंग्यांनी अवैधरित्या मिळवलेल्या जन्म प्रमाणपत्रांवर निर्बंध घालण्यासाठी फडणवीस सरकारने घेतलेला हा निर्णय अतिशय महत्त्वाचाच. नवीन नियमानुसार, कोणत्याही व्यक्तीने जन्म किंवा मृत्यू नोंदणीसाठी एका वर्षानंतर अर्ज केला आणि त्याच्याकडे त्यायोग्य पुरावे नसतील, तर त्याच्यावर थेट फौजदारी कारवाई करण्यात येईल. परंतु हे पुरेसे नाही. घुसखोर देशात आणि राज्यात प्रवेश कसा करतात. त्यांना स्थानिक मशिदी आश्रय कसा देतात. त्यांच्या चरितार्थाची सोय लावणे, त्यांना विभिन्न कागदपत्र मिळवण्यास मदत करणे. या सगळ्या उचापती स्थानिक मशिदी आणि मौलाना मंडळी करत असतात. त्यामुळे मौलाना मंडळींना पकडणे , त्यांनी सरकारी कर्मचार्यांना या कागदपत्रांसाठी पैसे खायला घातले असतील त्यांची यादी मिळवणे आणि त्यांच्यावर कारवाई सुद्धा आवश्यक आहे.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
महाविकास आघाडी दुतोंडीपणा करते आहे. इतके दिवस शरद पवारांची राष्ट्रवादी औरंग्याला सूफी संत म्हणत होती. आव्हाड औरंग्याचा आणि अफझलखानाचा गौरवपूर्वक उल्लेख करत होता. पण आता परिस्थिती बदलली आहे. छावा चित्रपटामुळे औरंग्या काय लायकीचा होता हे उभ्या देशाला समजले आहे. त्यामुळे आता जर औरंग्याचे गुणगान केले तर हिंदू मतदार बिथरतील हे त्यांच्या लक्षात आले आहे. त्यामुळे आता औरंगजेब क्रूर होता हे मान्य करत त्याचे थडगे मात्र कायम राहावे असा त्यांचा प्रयास सुरू झाला आहे. २७ वर्ष औरंगजेबाला येथे राहून राज्य करता आले नाही; त्याचे प्रतीक म्हणजे औरंगजेबाची कबर आहे, त्यामुळे एक प्रतीक म्हणून त्या कबरीला हात न लावण्याचे योग्य ठरेल. औरंगजेबाची कबर म्हणजे विरत्वाची कबर नाही तर ती कबर क्रूरपणाची आहे. ती कबर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जाज्वल्य इतिहासाची साक्ष देखील आहे. त्यामुळे औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी करणे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा जाज्वल्य इतिहास पुसण्याचा प्रकार आहे.औरंगजेब क्रूर होता हे स्पष्टच आहे. परंतु छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात औरंगजेबाला गाढलं हे दाखवण तितकंच गरजेचं आहे. ते काढून टाकलं तर औरंगजेबाला कुठे गाढलं हे कळणार नाही. अशा प्रकारची विधाने करून औरंग्याला विरोध पण कबरीला समर्थन असा दुतोंडीपणा महाआघाडीचे नेते करत आहेत.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
बलुचिस्तान लिबरेशन आर्मी या संघटनेने पाकिस्तानी सैन्याला आजवरच्या सर्वात रक्तरंजीत रमजानची भेट दिली आहे. फाळणीच्या वेळी बलुचिस्तान भारतसोबत राहू इच्छित होता, ते जमणार नसेल तर त्यांना स्वतंत्र रहायचे होते. परंतु पाकिस्तान ने हल्ला करून हा भूभाग ताब्यात घेऊन स्वतःच्या देशाला जोडला. बलुचिस्तान पाकिस्तान च्या एकूण क्षेत्रफळाच्या 40 टक्के आहे आणि हा भूभाग नैसर्गिक साधनसंपत्तीने समृद्ध आहे. पाकिस्तान याभूमीचे शोषण करत असल्याने बलुचिस्तान स्वतंत्र करण्याचा लढा 1948 पासूनच सुरू आहे. त्यामुळे बलुचिस्तानी स्वातंत्र्य सैनिक पाकिस्तानी सैन्यावर कायमच हल्ले चढवत असतात. जाफर एक्स्प्रेस हल्ल्यात तब्बल 150 पाकिस्तानी सैनिक मारले गेले होते. या घटनेचा धक्का संपतो न संपतो तोच बलुचिस्तानच्या नोशकीमध्ये रविवारी १६ मार्च २०२५ रोजी झालेल्या एका स्फोटात पाकिस्तानच्या फ्रंटियर कॉर्प्सच्या तीन सैनिकांसह पाच जण सैनिक मारले गेले आणि किमान ३० हून अधिक जखमी झाले आहेत. बलुचिस्तान लिबरेशन आर्मी बीएलएने हल्ल्याची जबाबदारी घेतली आणि ९० सैनिकांना मारल्याचा दावा करण्यात आला. बीएलएने म्हटले की, त्यांच्या माजीद ब्रिगेडने आरसीडी महामार्गावर हल्ला केला. या हल्ल्यात एक बस उद्ध्वस्त करण्यात आली. त्यानंतर दुसऱ्या बसला घेराव घालण्यात आला आणि ज्यात इतर काही सैनिक ठार मारले गेले. बलुचिस्तान स्वतंत्र झाल्याशिवाय हा हिंसाचार थांबणे अशक्य आहे.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
सेक्युलर असल्याचे नाटक कधी कधी अंगलट येते. प्रसिद्ध तामिळ अभिनेता विजय हा धर्मांतरीत व्यक्ती असून पूर्वाश्रमीचा हिंदू आहे. त्याने हा इफ्तार कार्यक्रम शुक्रवारी रॉयपेट्टा वायएमसिए मैदानात आयोजित केला होता. त्यांनी मुस्लिम टोपी घालून नमाजमध्ये सहभाग घेतला आणि नंतर उपवास सोडला. त्यांनी उपस्थितांसोबत इफ्तार भोजनही केले. या कार्यक्रमाचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. परंतु तामिळनाडू सुन्नत जमातने अभिनेता थलपती विजयच्या विरोधात चेन्नई पोलीस आयुक्त कार्यालयात तक्रार दाखल केली आहे. इफ्तार कार्यक्रमात ‘मुस्लिमांचा अपमान’ झाल्याचा त्यांचा आरोप आहे. तक्रारीबाबत बोलताना तामिळनाडू सुन्नत जमातचे खजिनदार सय्यद कौस यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यांनी सांगितले, "विजय ने आयोजित केलेल्या इफ्तार कार्यक्रमात मुस्लिमांचा अपमान करण्यात आला. या कार्यक्रमात काही मद्यपी आणि गुंड सामील झाले होते, ज्यांचा उपवास किंवा इफ्तारशी काहीही संबंध नव्हता. त्यामुळे हा कार्यक्रम मुस्लिमांसाठी अपमानास्पद ठरला." थोडक्यात विजय थलपती यांचा स्टंट त्यांच्या अंगलट आला आहे.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
प्रेताच्या टाळूचे लोणी खाणे हा वाक्प्रचार आपण ऐकला होता परंतु तो वास्तवात बघण्यात आला आहे. आशिष विशाळ या महाभागाने आमदार सुरेश धस यांचे लेटर हेड वापरले आणि त्यावर स्व. संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांना मदत करायची आहे असे खोटे लिहून त्याआधारे शेकडो शासकीय अधिकारी व व्यावसायिकांकडून करोडो रुपयांची खंडणी गोळा केली. या महाभागणे या जमा केलेल्या खंडणीच्या पैशातून एका बँकेत चक्क दोन कोटी रुपयांची एफ डी सुद्धा केली. त्यानंतर त्याने एक अठरा लाख रुपयांची कार विकत घेतली. उर्वरित पैशाचा काय विनियोग केला हे त्यालाच ठावूक. हे प्रकरण बाहेर पडले तेंव्हा पत्रकारांनी आमदार सुरेश धस यांना गाठले आणि आशिष विशाळ हा तुमचा सहकारी आहे का असा प्रश्न विचारला तेंव्हा सुरेश धसांनी मी त्याला ओळखत नसल्याचे प्रसार माध्यमांना स्पष्टपणाने सांगितले. परंतु बीड मधे तहसीलदारांना सुरेश धस यांनी लिहीलेल्या पत्रात आशिष विशाळ हा माझा जवळचा सहकारी आहे असे लिहिले होते. पत्रकारांनी परत सुरेश धस यांना गाठून प्रश्नांची सरबत्ती केली असतं त्यांनी आशिष विशाळ माझ्या जवळचा व्यक्ती असल्याचे कबुल केले. स्व. संतोष देशमुख यांच्या नावाने खंडणी गोळा केल्याबद्दल आशीष विशाळ आणि सुरेश धस यांच्यावर कारवाई होईल का ?
🔽





Comments