🖋️ अभिजीत राणे लिहितात
- dhadakkamgarunion0
- Apr 1
- 4 min read
🖋️ अभिजीत राणे लिहितात
जागतिक पातळीवर आपल्या देशाला मान्यता मिळावी म्हणून का होईना परंतु मानवी पद्धतीचे कायदे लागू करण्याची अफगाणिस्तानच्या तालिबान राजवटीची तयारी नाही हे त्यांनी स्पष्ट केले आहे. ईद च्या निमित्ताने त्यांनी आपल्या देशातील आणि जगभरातील नागरिकांसाठी केलेल्या संबोधनात हे स्पष्ट झाले आहे. आम्हाला पाश्चिमात्य कायद्यांची गरज नसून आमच्या देशात शरिया कायदा लागू करण्याची आवश्यकता आहे. तालिबानने शरिया कायद्यांमुळे अफगाण महिला आणि मुलींवर अनेक निर्बंध लादले आहेत. यामुळे तेथिल महिलांना त्यांचे शिक्षण, नोकरी आणि बहुतांश सार्वजनिक ठिकाणांपासून वंचित राहावे लागले आहे.अफगाणिस्तानमध्ये शरिया कायद्यांमुळे हा देश जागतिक पटलावर एकाकी पडला आहे. याशिवाय त्यांनी चीन आणि संयुक्त अरब अमिरातीसह देशांशी राजनैतिक संबंध प्रस्थापित केले आहेत. थोडक्यात अफगाणिस्तानमध्ये अजून काही वर्ष तरी मानवतावादाला स्थान असणार नसून अजून काही वर्षे तरी अफगाणिस्तान हा १४०० वर्ष जुन्या कालखंडातच जगणार असेच एकंदर चित्र आहे.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
कम्युनिस्ट राज्यकर्ते परस्पर विरोधी वर्तन करतात परंतु त्यांच्याकडे हुकुमशाही असल्याने त्यांना कोणीही प्रश्न विचारू शकत नाहीत. चीनमध्ये रहाणार्या उगर मुस्लिमांचे तिथले सरकार अक्षरशः लचके तोडत आहे. परंतु पाकिस्तानच्या मुस्लिमांच्यासाठी मात्र योजना आखून चीन काम करत असल्याचा ढोल वाजवत आहे. बेल्ट अँड रोड ईनीशीएटीव्ह या प्रकल्पाअंतर्गत पाकिस्तानातील टप्पा असणार्या सीपेक योजनेसाठी चीनने २० अरब डॉलर खर्च केले आहेत. पण योजना अजून पूर्ण नाही. बलुचिस्तान मधून या योजनेचा जितका भाग जातो त्या सगळ्या ठिकाणी आग लागली आहे. चीनी इंजिनियर मारले जात आहेत पण चीन योजना रेटून नेतोय. पाकिस्तान झेपता झेपत नाही आणि चीनला आता बांगलादेशात हातपाय पसरण्याची हौस आली आहे. धर्मांध मुसलमान राज्यकर्ते हे स्वतः नालायक असतात आणि कुणाचे तरी प्यादे बनून त्यांना सत्ता उपभोगायची असते. आता मोहम्मद युनूस शी जिन पिंग यांना आपला बाप बनवून त्यांना बांग्लादेशमध्ये विकासात सहभागी होण्यासाठी आमंत्रित करत आहेत आणि त्या जोडीला अत्यंत अनावश्यक आणि घातक वक्तव्य करत आहेत. ते म्हणजे भारतातील नॉर्थ ईस्ट प्रदेश लँड लॉक आहे. अर्थात तुम्ही इथे येऊन भारतातील नॉर्थ ईस्टचा लचका तोडू शकता.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
देवेंद्र फडणवीस हे मोदींचे उत्तराधिकारी आहेत का ? हा प्रश्न मोदींच्या नागपुर दौर्यानंतर चर्चेत आहे. अर्थात ही चर्चा संघाशी संबंधित नसणारी वृत्तपत्रे आणि मिडिया व राजकीय पक्ष करत आहेत. ही चर्चा अत्यंत उथळ असून ज्यांना संघाची कार्यशैली ज्ञात नाही अश्या मंडळींनी सुरू केलेल्या या बडबडीला काहीही अर्थ नाही. या चर्चेची दोन तीन उद्दिष्टे आहेत. पहिले उद्दीष्ट मोदी नक्की कधी पदत्याग करणार याबद्दल संकेत प्राप्त करून घेणे हे आहे. अमित शहा यांनी मोदी २०२९ पर्यन्त पंतप्रधान रहाणार हे सांगितल्यामुळे हा मुद्दा निरर्थक ठरतो. मोदींचा उत्तराधिकारी कोण ? अमित शहा, देवेंद्र फडणवीस का योगी आदित्यनाथ ? या विषयावर दळण दळायला मिडिया मोकळा आहे कारण त्यांना टी आर पी मिळवायचा आहे परंतु वास्तव वेगळे आहे. मोदींची अजून ४ वर्ष बाकी आहेत त्यामुळे आत्ता त्या संदर्भात चर्चा करण्यात काहीही हशील नाही पण मीडियाला इतका विवेक आणि संयम दोन्ही नाही. त्यामुळे ही वांझोटी चर्चा आहे यात संशय नाही. त्यातल्यात्यात योगी आदित्यनाथ होणार नाहीत कारण ते संघाचे नाहीत हा न्यारेटीव्ह मीडियाच रेतून नेतोय कारण योगीजी आले तर आपली खैर नाही या मुद्द्यावर दिल्लीतील समस्त राजकीय पक्ष , ल्युटेन मिडिया यांचे एकमत असल्याने योगी नाहीत योगी नाहीत हा कोलाहल मिडियामध्ये जास्त आहे.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
बिहार , मध्यप्रदेश ,ओरिसा, उत्तरप्रदेश अश्या चार राज्यांचा मिळून बिमारू असा उल्लेख होत असे. ही चार राज्ये विकासात शून्य आणि गुन्हेगारीत अग्रेसर अशीच यांची ओळख होती. जिस को जो भाषा समझ आती है उसे उसी भाषा मे जवाब मिलेगा हे सांगणार्या योगी आदित्यनाथ यांच्या कारकिर्दीत उत्तरप्रदेशात गुन्हेगारीत ८५ % घट झाली आहे. उत्तर प्रदेशात सुरू असणाऱ्या चोरी, अपहरणासारख्या घटनांवर अंकुश लावण्यात योगी आदित्यनाथ यांचा हात कोणीही धरू शकत नाही. लूटमारीच्या अनेक घटना उत्तर प्रदेशात घडत होत्या. मात्र, आता उत्तर प्रदेशातील घडणाऱ्या अशा अनेक घटनांपासून उत्तर प्रदेश सुरक्षित आहे, कारण हत्या सारख्या घटनांमध्येही ४१ टक्क्यांची घट झाली आहे. या ८ वर्षांमध्ये २२२ गुन्हेगारांचा एन्काउंटर करण्यात आला होता. यामध्ये ८११८ आरोपी घायाळ झाले होते. यानंतर आता आरोपी स्वत:हून पोलीस ठाण्यात जात असल्याची माहिती समोर येत आहे. योगी बाबाचा बुलडोजर पॅटर्न आणि तत्काळ व धडक न्याय देण्याच्या पद्धतीमुळे बहुसंख्य गुन्हेगार गुन्हा करण्यास धजावत नाहीत. मुलींना छेडनार्या फुटकळ गुन्हेगारांना पकडून त्यांना मारहाण करतात आणि त्या मुलीची छेड काढली तिथेच माफी मागायला लावतात. यातून त्या गुन्हेगारांची पुन्हा गुन्हा करण्याची हिम्मत होत नाही. महाराष्ट्रात सुद्धा योगी पॅटर्न राबवा अशी हिंदुत्ववाद्यांची खूप जुनी मागणी आहे आणि तिची हळू हळू सुरुवात होत आहे.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
चोराच्या उलट्या बोंबा ही म्हण सोनिया गांधी यांना चपखलपणाने लागू होते. कोंग्रेसच्या राजवटीत सुरुवातीलाच मौलाना अबूल कलाम आझाद यांच्या हातात शैक्षणिक धोरण देत कोंग्रेस सरकारने निधर्मी राजवट या संकल्पनेला सुरुंग लावणारे शैक्षणिक धोरण आखले. नंतरच्या समस्त सरकारांनी ही याचीच री ओढली. कम्युनिस्ट मंडळींनी देशाच्या इतिहासाची वाट लावली. पोरस सिकंदर लढाईत सिकंदर जिंकला असे धादांत असत्य आपल्या मुलांना शिकवले गेले. नवीन शैक्षणिक धोरणात या सगळ्या थापा काढून या देशाचा खरा इतिहास शिकवण्याचे नियोजन होताना पाहून सोनिया गांधी व्यथित झाल्या आहेत, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात शिक्षणाचे केंद्रीकरण, व्यावसायीकरण आणि सांप्रदायिकीकरण सुरु असल्याच म्हटले आहे. सोनिया गांधी यांनी केंद्रावर, संघीय शिक्षा व्यवस्थेला कमकुवत केल्याचा आरोप केला आहे. मोदी सरकार राज्य सरकारांना महत्त्वाच्या धोरणात्मक निर्णयाच्या बाहेर ठेऊन शिक्षणाचा संघीय पाया कमकुवत करत आहे, अशी टीका सोनिया गांधी यांनी केली आहे. परंतु या अरण्य रुदनाचा काहीही फायदा होणार नसून यापुढे मुले खोटा इतिहास शिकणार नाहीत यापुढे औरंग्या कसा पापी होता हेच शिकणार असून त्याला यापुढे कोणीही त्याला सूफी संत म्हणणार नाही.
🔽
#afganistan #taliban #china #muslim #pakistan #DevendraFadnavis #NarendraModi #Primeminister #YogiAdityanath #SoniyaGandhi #congress #abhijeetrane





Comentários