🖋️ अभिजीत राणे लिहितात
- dhadakkamgarunion0
- Apr 7
- 3 min read
🖋️ अभिजीत राणे लिहितात
राजकीय नेता कसा नसावा याचा आदर्श राज ठाकरे जगापुढे घालून देत आहेत. प्रत्येक वेळी राज ठाकरे योग्य मुद्द्यावर जनआंदोलनाची घोषणा करतात. जनआंदोलन हे कायद्याच्या चौकटीत राहून सुद्धा करता येते परंतु राज ठाकरे यांचे प्रत्येक जनआंदोलन खळ्ळखट्याक वालेच असते. अर्थात कायदा हातात घेऊन लोकांना मारहाण करणे, त्रास देणे अश्याच स्वरूपाचे आंदोलन करण्यात त्यांना भूषण वाटते. तरीही त्यांनी हाती घेतलेला मुद्दा योग्य असल्याने लोक यालासुद्धा समर्थन देतात आणि जनसमर्थन मिळते आहे हे दिसले की राज ठाकरे आंदोलन पूर्ण गुंडाळून टाकतात. शिवसेनेची कार्यशैली भिन्न होती. ते जनआंदोलन उभे करत. पहिले सनदशीर मार्गाने केले जाई. सरकार जुमानत नाही म्हटल्यावर कायदा हाती घेतला जाई. शिवसेनेने प्रत्येक आंदोलन निर्णायक स्तरापर्यंत लढवले आहे. मनसेचे आंदोलन हे खळ्ळखट्याक वर सुरू होते आणि लोकांचे समर्थन निर्माण होऊ लागते न लागते तोच राज ठाकरे यांनी आंदोलन गुंडाळलेले असते. यामुळे या पक्षाची आणि राज ठाकरे यांची विश्वासार्हता संपुष्टात येते आहे हे त्यांनाच उमजत नाही. टोल आंदोलनाला लोकांनी पाठिंबा द्यायला सुरुवात केली राज ठाकरेंनी आंदोलन मागे घेतले. बँकेतील व्यवहार मराठीत व्हावे या मुद्द्याला लोकांनी समर्थन द्यायला सुरुवात केली राज ठाकरेंनी आंदोलन मागे घेतले. या धरसोड करण्याच्या स्वभावाने मनसे लवकरच इतिहासजमा होणार यात संशय नाही.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
वेगवेगळ्या प्रकारचे जिहाद प्रचलित असताना अजून एक नवीन प्रकारचा जिहाद उघडकीस आला आहे. या जिहादचे नाव आहे डॉक्टर जिहाद. मध्य प्रदेशातील तिलवाडा गावात एका क्लिनिकमध्ये धर्मांतराचा अनोखा प्रकर घडला आहे. उपचाराच्या नावाखाली कट्टरपंथी मुस्लिम डॉक्टरने एका हिंदू युवतीला आपल्या विश्वासात घेत तिला धर्मातर करण्यास सांगितले. तिचे अनेकदा ब्रेनवॉशही करण्यात आले. तिच्यावर मानसिक दबाव आणला गेला आणि या दडपणाखाली ती मुलगी धर्मांतराला तयार झाली होती. इकडे मुलीचे बदललेले वर्तन कुटुंबियांच्या लक्षात आले आणि त्यांनी अधिक चौकशी केल्यावर सगळेच प्रकरण उघड झाले. त्यानंतर त्या कुटुंबाने पोलिसांकडे धाव घेतली. त्यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपी डॉक्टर खालिद खानच्या मुसक्या आवळल्या आहेत. खालिद खानवर धार्मिक स्वातंत्र्य कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील चौकशीत या डॉक्टरने अश्या पद्धतीने अनेक तरुणींना जाळयात अडकवल्याचे उघड झाले आहे. धर्मांतरावर बंदी घालणारे कायदे का आवश्यक आहेत हे या प्रकरणातून लक्षात येते.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
संविधांनातील अल्पसंख्यांक या तरतुदीचा लाभ घेत ख्रिस्ती धार्मिक संस्थांनी आपल्याकडे मिशनरी शाळा सुरू केल्या आहेत. आपल्या मुलांना फाड फाड इंग्रजी बोलता यावे या आशेने हिंदू पालक आपल्या पाल्यांना या शाळांमध्ये प्रवेश देतात. या शाळा इंग्रजी भाषेच्या जोडीला या मुलामुलींवर ख्रिस्ती धर्मसंस्कार करतात. ख्रिस्ती धर्मसंस्कार एकवेळ कमी केले जातात परंतु हिंदू धर्म आणि परंपरांबद्दल पराकोटीचा द्वेष निर्माण होईल याची जाणीवपूर्वक काळजी घेतली जाते. असेच एक प्रकरण मध्यप्रदेशात जबलपुर इथल्या जोय स्कूल मध्ये झाला त्यामुळे संतापलेल्या स्थानिक नागरिकांनी शाळेवर हल्ला करून तोडफोड केली. हिंदू मुलामुलींना धर्मांतरीत करणे हाच आपला अधिकार समजणार्या शाळेच्या मुख्याध्यापकाला अत्यंत अवमान वाटला. त्याने हिंदूंचा उल्लेख “ब्लडी राम के हिंसक बच्चे” असा करणारे ट्विट रामनवमीच्या मुहूर्तावर केले त्यामुळे त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला गेला असून त्याला केरळातून अटक करण्यात आली आहे. आपल्या संविधांनातील अल्पसंख्यांकांच्या संदर्भातील कायदे बदलणे आवश्यक आहे.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
भाजपाचे फायरब्राण्ड नेते किरीट सोमय्या यांनी आता नवीन आव्हान स्वीकारले आहे. मशिदींवरील भोंगे एकतर काढले गेले पाहिजे किंवा सकाळी सहा ते रात्री दहाची वेळ पाळूनच अजान दिली गेली पाहिजे या दृष्टीने कायद्यात बदल करण्याची प्रक्रिया चालू असून ती पूर्ण झाल्यानंतर या कायद्याच्या अंमलबजावणीच्या दृष्टीने कार्यरत होण्याची जबाबदारी भाजपाने किरीट सोमय्या यांच्याकडे दिली आहे. किरीटजींनी यापूर्वी बांगलादेशी घुसखोरांना कायदेशीर निवासी करणारे षडयंत्र उघडकीला आणले असून त्या प्रकरणात सिल्लोड मधील आमदार आणि अनेक सरकारी कर्मचारी सामील असल्याचे उघडकीस आले होते. अश्या प्रकारची अनेक प्रकरणे उघडकीस येत असून यात संबंधितांना शिक्षा होणे आणि घुसखोरांना हाकलण्याची प्रक्रिया पूर्ण करणे या कामावर सुद्धा सोमय्याजींची नजर आहे. एक अत्यंत कार्यक्षम नेता असणार्या किरीट सोमय्या यांची धास्ती समस्त घोटाळेबाज नेते आणि सरकारी कर्मचारी बाळगून असतात. त्यामुळे त्यांच्याकडे मशिदीवरील भोंगे हे प्रकरण दिल्यास ते तडीला नेतील यात संशय नाही.
⬇️
🖋️ अभिजीत राणे लिहितात
वक्फ कायदा सुधारणा विधेयकाला राष्ट्रपतींची मंजूरी मिळाली असून आता त्याचे कायद्यात रूपांतर झाले आहे. या कायद्याला ख्रिस्ती धार्मिक संघटनांनी पाठिंबा दिला होता आणि त्यामुळेच या कायद्याच्या विरोधात भाषण करण्याची चूक सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी केली नाही. मुस्लिम महिला पर्सनल लॉं बोर्डाने सुद्धा या बदललेल्या स्वरुपातील कायद्याचे स्वागत केले आहे कारण आता वक्फ बोर्डावर महिला सभासद सुद्धा असणार आहेत. दुसरीकडे कोंग्रेस पक्ष आणि ओवेसी हे दोघेही या कायद्याच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार आहोत म्हणून घोषणा करून बसले आहेत. काही मुस्लिम संघटना रस्त्यावर येऊन आंदोलन पण करत आहेत. परंतु सर्वसामान्य सुशिक्षित मुस्लिमांनी या कायद्यातील बदलाची दखल सुद्धा घेतलेली नाही. कारण वक्फ बोर्डाने गेल्या 75 वर्षात सामान्य मुस्लिमांचे काहीही भले केलेले नाही. सामान्य मुस्लिमांच्या हिताच्या दृष्टीने या कायद्याच्या असण्या नसण्याने काहीही फरक पडत नाही. एरवी राहुल गांधी आग पेटवण्यास उत्सुक असतात पण ख्रिस्ती संघटना सुद्धा वक्फ कायद्याने हैराण झाल्या होत्या त्यामुळे या बदलाला विरोध म्हणजे ख्रिस्ती मते गमवणे हे त्यांना नेमके माहिती आहे. त्यामुळे या कायद्याच्या माध्यमातून हिंदू मुस्लिम द्वेषाची आग पेटवता येईल ही दिवास्वप्ने बघणारे तोंडघशी पडले आहेत.
🔽
#RajThackeray #MNS #jihad #doctorjihad #jabalpur #school #koritsomaiya #maschid #loudspeaker #WaqfAmendmentBill #abhijeetrane





Comments