🖋️ अभिजीत राणे लिहितात
- dhadakkamgarunion0
- Apr 10
- 3 min read
🖋️ अभिजीत राणे लिहितात
महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानीच्या गावात ड्रग्सचा व्यापार व्हावा आणि या व्यापारात तब्बल 11 मंडळी देवीची पुजारी असावीत यापेक्षा अधिक सामाजिक अधःपतन दुसरे काय असू शकेल ? तुळजापूर सारख्या छोट्या गावात ड्रग्स इतक्या मुबलक प्रमाणात पोचतात आणि त्याच्या विक्रीचे एक रॅकेट तयार होते ही गृहखात्याच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित करणारी घटना आहे. या रॅकेटचा भाग देवीच्या मंदिरातील पुजारी असणे हे अधिकच गंभीर असून या संबंधित सर्व मंडळींची देवीच्या मंदिरातील सेवा तातडीने रद्दबादल करणे अत्यंत आवश्यक आहे. देवीचा पुजारी हा समाजातील आदरणीय व्यक्ती असतो त्याच्याकडे एक आदर्श म्हणून बघितले जाते अश्या व्यक्तींनी आपल्या पदाला कालिमा फासणे अत्यंत लज्जास्पद असून या संबंधितांवर न्यायालयाने अत्यंत कठोर कारवाई करणे आवश्यक आहे. त्याच प्रमाणे हे प्रकरण एक महिन्यापूर्वी उघडकीस आले होते त्यावर कारवाई सुरू होती परंतु आता विशिष्ट वेळी हे प्रकरण मीडियाने उचलून का धरले आहे ? हा सुद्धा प्रश्न त्यानिमित्ताने निर्माण होतो आहे.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
भारताचे सामर्थ्य कशात आहे ? याचे उत्तर आहे आपल्या संविधानात. संपूर्ण जगात इस्लामी आक्रमकांनी स्थानिक धर्मियांची स्थळे उध्वस्त केली आणि तिथे आपली प्रार्थनास्थळे बनवली. तुर्की मध्ये तर एक हगिया सोफिया म्हणून मशीद आहे. ती आधी चर्च होती. इस्लामी राज्यकर्ते आले त्यांनी त्याची मशीद बनवली. अशी अनेक स्थळे आहेत जिथे नंतर स्थानिक धर्मियांची ख्रिस्ती नागरिकांची सत्ता स्थापन झाली पण तिथल्या धार्मिक स्थळांना मूळ स्वरूप आले नाही. परंतु भारतात न्यायालयाने राम मंदिर आहे हे पुरावे पाहून मान्य केले आणि तिथे राम मंदिर उभे राहिले. हे जगात कुठेही झाले नाही. 26/11 च्या हल्ल्यात तहव्वुर राणा हा मुख्य आरोपी आहे. तो अमेरिकन तुरुंगात होता भारताने दीर्घकालीन न्यायलयीन लढाई आणि मुत्सद्देगिरी वापरुन त्याचे प्रत्यर्पण करून घेतले आहे. आता त्याला आपल्या कोर्टात लढावे लागेल आणि त्याला आपण शिक्षा देऊ. यातून परत एकदा काय सिद्ध होईल.. ? इस्तरायल त्यांच्या शत्रूंना ते असतील तिथे जाऊन गोळ्या घालते. आम्ही आमच्या शत्रूंना पकडून फरफटत आमच्या न्यायालयात आणतो आणि त्यांना शिक्षा देतो. एक सुसंस्कृत आणि सार्वभौम राष्ट्र यापेक्षा वेगळे असू शकत नाही. भारतीय असल्याचा अभिमान वाटणारा आणि संविधानाबद्दल परत एकदा आदर निर्माण करणारा हा घटनाक्रम आहे.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
कुत्र्याचे शेपूट कायमच वाकडे असते. मुस्लिमांच्या मतांवर सत्तेवर बसलेली ममता बानो उर्फ ममता बॅनर्जी या कायमच वक्फ सुधारणा विधेयकाच्या विरोधात उभ्या होत्या. आता तो कायदा पारित झाल्यावर त्या आपल्या नेहमीच्या आक्रस्ताळ्या भूमिकेत प्रकटल्या आहेत. हा कायदा काहीही झाले तरी मी पश्चिम बंगाल मध्ये लागू करणार नाही अशी गर्जना त्यांनी केली आहे. अश्या मंडळींना आपल्या देशाचे संविधान आणि त्यातील मूलभूत तरतुदी सुद्धा माहिती नसतात केवळ आपल्या मतदारांना खुश करण्यासाठी अवास्तव वचने देण्याची त्यांना घाई असते. वक्फ बोर्ड सुधारणा कायदा हा आपल्या संसदेने पारित केला आहे आणि संसद सार्वभौम आहे त्यामुळे हा कायदा आपआपल्या राज्यात लागू करणे हे प्रत्येक मुख्यमंत्र्याला अनिवार्य आहे. अर्थातच हा कायदा पश्चिम बंगाल मध्ये सुद्धा लागू होणार आहे. परंतु या मुद्दयाचा राजकीय लाभ घेण्यासाठी ममता बॅनर्जी आपल्या मतदारांना मूर्ख बनवण्याचे उद्योग करत आहेत आणि अर्थातच त्यांचा मतदार मूर्ख बनतो आहे.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
घरबसल्या 10 मिनिटात एक कोटीपर्यंतचे कर्ज ! अविश्वासनिय वाटणारी ही संकल्पना सत्यात आली आहे. मुकेश अंबानी यांच्या जियो फायनान्शियल सर्व्हिसेसने ही कर्ज योजना घोषित केली आहे. यात तुमचे डीमॅट खात्यात ठेवलेले शेअर्स आणि म्युच्युअल फण्ड्स तारण ठेवून हे कर्ज मिळवू शकता. या कर्जावर तुम्हाला 9.99 % व्याजदर आकाराला जाईल. या कर्जाची तुम्ही तीन वर्षात परतफेड करू शकणार आहात. वरकरणी ही योजना आकर्षक दिसत असली तरी अश्याच पद्धतीची भुरळ पर्सनल लोन्स ने निर्माण केली होती आणि नंतर त्यामुळे लोकांची खर्चिक प्रवृत्ती वाढल्याचे लक्षात आले. शेअर्स आणि म्युच्युअल फण्ड्स तारण म्हणून स्वीकारणे ही संकल्पना अभिनव आणि सर्वात सुरक्षित वाटत आहे परंतु कर्ज परतफेड करण्यात अपयश आल्यास त्याची वसूली करण्यासाठी शेअर्सची विक्री करून कर्ज रकमेपेक्षा अधिकचा परतावा कर्जदाराला मिळेल का तो जियोच्या खिशात जाईल हे पुरेसे स्पष्ट नाही.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
नेते मंडळी , मंत्री हे जे काही बोलतात ते आणि जमीनीवरील वास्तव यात असणारी दरी दिवसेनदिवस वाढताना दिसते आहे आणि याकडे आता दुर्लक्ष करणे अशक्य झाले आहे. काल वंनमंत्री गणेश नाईक यांनी एक वक्तव्य केले महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळाच्या 21 टक्के क्षेत्र हे वनांचे असून आता हे क्षेत्र 30 टक्के पर्यन्त वाढवण्याचे आमचे लक्ष्य आहे असे ते म्हणाले. आता यातील सत्य काय ? येउर च्या वनखात्याच्या जमीनींवर ठाकरे कुटुंबापासून सगळ्या राजकीय नेत्यांचे बंगले आहेत. मुंब्रा भागातील वनखात्याच्या जमिनीवर बांगलादेशी घुसखोर मंडळींनी जितेंद्र आव्हाड यांच्या कृपेने मोठमोठ्या चाळी उभ्या केल्या आहेत. देशातील एकमेव भुईकोट किल्ला असणार्या दौलताबाद / देवगिरीच्या किल्ल्यावरील वाळलेल्या गवताला काल आग लावली गेली आणि शेकडो एकर जमीनीवरील गवत आणि झाडे जळून खाक झाली. राखीव वनात फिरणारे आदिवासी वन खात्याच्या कर्मचार्यांशी वाद झाला की वाळलेले गवत पेटवून देतात आणि वणवा पसरतो ज्यात शेकडो एकर वनक्षेत्र उध्वस्त होते. पिंपरीचिंचवड मध्ये वनक्षेत्र उध्वस्त झाल्याने जुन्नर भागातील बिबटे सर्वत्र विहार करताना दिसतात. आमची मंत्री महोदयांना विनंती आहे, या सगळ्या गोष्टींवर नियंत्रण मिळवा. 21 % वनक्षेत्र म्हणत आहात त्यातील आधी अतिक्रमण हटवा आणि मग वनक्षेत्र वाढवण्याचे आश्वासन द्या.
🔽





Comments