अभिजीत राणे लिहितात
- dhadakkamgarunion0
- Apr 11
- 3 min read
अभिजीत राणे लिहितात
राहुल गांधी यांनी भारतीयांना घाबरवण्यास प्रारंभ केला आहे. आर्थिक मंदीचे वादळ आपल्या देशाला धडकणार आहे. नरेंद्र मोदी याबद्दल एकही शब्द बोलत नाहीत. कोंग्रेसच्या राजवटीत शेअर बाजारावर कोंग्रेसी दलालांचा वरचष्मा होता जे भीती निर्माण करून शेअर चे भाव पाडून मग खरेदी करत आणि भरपूर पैसे कमावत होते. अजूनही त्यांची पद्धत तीच आहे. पण ज्याला देवाने डोळे दिले आहेत त्याला दिसेल की मंदीची नाही तर तेजीची लाट येणार आहे. अमेरिका चीन व्यापार युद्धात चीनमधील अमेरिकेची गुंतवणूक बाहेर पडेल ती विश्वसनीय बाजार म्हणून भारतात होईल. चीन मधील अमेरिकन कंपन्यांचे कारखाने भारतात येण्यास सुरुवात आधीच झालेली आहे. चीन मधून जे उत्पादन अमेरिकन बाजारात जात होते तेच उत्पादन आता भारतीय लोक अमेरिकेला विकतील. अर्थात देशात येणारे परकीय चलन सर्वांगाने वाढणार आहे. कंपन्या आल्याने रोजगार वाढणार आहे. निर्यात वाढल्याने सुद्धा रोजगार वाढणार आहे आणि पप्पू राहुल गांधी लोकांना आर्थिक मंदीची भीती दाखवतो आहे.
अभिजीत राणे लिहितात
ट्रंप यांच्या मेथड इन म्याडनेस वर संपूर्ण जग फिदा झाले आहे. हा माणूस अत्यंत सणकी आहे मनात येईल तसे वागतो पण तरीही जगभरातील लोकांना त्याच्याबद्दल आदरच वाटतो आहे कारण त्याचे हे सणकी वागणे त्याच्या देशाचे हित डोळ्यासमोर ठेवून असते आणि कोणत्याही राजकीय नेत्याचे मूल्यांकन सामान्य लोक त्याचे आपल्या देशावर किती प्रेम आहे याच चष्म्यातून करतात. ट्रंप यांनी आधी जगावर रेसिप्रोकल टेरिफ लावले. चीनने संतपून प्रत्युत्तर दिले. ट्रंप यांना तेच हवे होते त्यांनी चीनवर 125 % टेरिफ आणि आधीचे 20 % असे एकूण 145 % टेरिफ लादले जोडीला बाकीच्या सगळ्याच देशांवरील टेरिफला 90 दिवसांची सवलत दिली. परिणाम जगभरातील शेअर बाजार सुधारले. अमेरिकन शेअर बाजाराने न भूतो नो भविष्यती झेप घेतली आणि चीन व त्यांच्याशी संलग्न सगळेच शेअर बाजार पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळले. ट्रंप यांची धोरणे अमेरिकन जनतेला सुखावत आहेत. भारतातील विरोधी पक्षनेत्यांनी सुद्धा भाजपा द्वेषाच्या आहारी जाऊन देशाचा अपमान करणारी भूमिका घेण्याचा मोह आवरला तर त्यांना चार जागा जास्त मिळू शकतात.
अभिजीत राणे लिहितात
पुढील वर्षी अर्थात एप्रिल 2026 मध्ये तामिळनाडू मध्ये विधानसभेच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. त्याच्या तब्बल एक वर्ष आधीच भाजपाने या निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. यावेळी भाजपाने अण्णा द्रमुक पक्षाशी युती करून निवडणुका लढवण्याचे निश्चित केले आहे. तामिळनाडू भाजपाचा चेहरा राज्य भाजपा अध्यक्ष अण्णामलाई यांच्यामुळे भाजपाने तामिळनाडू मध्ये चांगलेच पाय रोवले आहेत परंतु अण्णा द्रमुक पक्षाची मागणी होती की आम्हाला अण्णामलाई यांच्याबरोबर काम करणे जड जाते आहे. त्यांची आक्रमक प्रतिमा आमच्या मतदारांना विचलित करू शकते. मित्रपक्षाच्या मागणीचा विचार करून अण्णामलाई यांना राजीनामा देण्यास संगितले जाऊ शकते आणि त्यांच्याजागी नवीन प्रदेशाध्यक्ष नेमून ही निवडणूक लढवली जाईल. नयनार नागेंद्रन यांना प्रदेशाध्यक्षपद दिले जाऊ शकते. अण्णामलाई हाच भाजपा तामिळनाडूचा भविष्यातील चेहरा असल्यामुळे त्यांना केंद्रात मंत्रिपद दिले जाण्याची शक्यता आहे. या सगळ्या घडामोडींना मूर्त स्वरूप देण्यासाठी काल रात्री अमित शहा यांनी चेन्नई दौरा केला आणि अण्णा द्रमुक च्या नेत्यांची भेट सुद्धा घेतली आहे. तामिळनाडू मध्ये पुढील वर्षी भगवा फडकावण्यासाठी भाजपाने चांगलीच कंबर कसली आहे.
अभिजीत राणे लिहितात
एका गर्भवती स्त्रीवर वेळेत उपचार केले गेले नाहीत हा दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर आरोप झाला आहे. त्या मुद्द्यावरून सगळेच रुग्णालय प्रशासनाला धारेवर धरत आहेत आणि ते एका अर्थी योग्य आहे. प्रशासनाची चूक आहे. संचालक मंडळाने याची जबाबदारी घेऊन कारवाई करणे अपेक्षित आहे हे पण योग्य आहे. परंतु कोंग्रेस पक्षाचे महाराष्ट्रातील मोठे नेते विजय वडेट्टीवार यांनी या निमित्ताने मंगेशकर कुटुंबावर त्यांनी जी अश्लाघ्य आणि वैयक्तिक स्वरूपाची जी चिखलफेक केली आहे ती निषेधार्ह आहे. महाराष्ट्रातील समस्त पुरोगामी म्हणवणारे राजकीय नेते किती सडक्या मेंदूंचे आहेत आणि त्यांच्या मनात किती पराकोटीचा ब्राह्मणद्वेष भरला आहे हे या निमित्ताने उघड झाले आहे. महाराष्ट्र नावालाच पुरोगामी आहे मुळातून तो नखशिखांत जातीयवादी आहे आणि हे वारंवार सिद्ध होते आहे. विजय वडेट्टीवार यांचे पाय सुद्धा या निमित्ताने शेणाचे आहेत हे सिद्ध झाले.
अभिजीत राणे लिहितात
एखाद्या समाजाचे अधःपतन किती होऊ शकते याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे पंजाब राज्य आहे. पंजाब मध्ये शीख समाज बहुसंख्यांक आहे. शीख संप्रदायाची स्थापनाच इस्लामच्या आक्रमणाशी लढण्यासाठी तयार करण्यात आलेले हिंदू समाजाचे सैन्य म्हणून झाली आहे. प्रत्येक हिंदूने आपल्या घरातील मोठा मुलगा खालसा पंथाला अर्थात शीख संप्रदायाला देणे बंधनकारक होते. शिखांचे गुरु गोविंदसिंह यांचे वक्तव्य सुप्रसिद्ध आहे,” तुम्ही मोहरीच्या तेलात कोपरापर्यंत हात बुडवा. त्या हाताला तिळाच्या पोत्यात घुसवा, तुमच्या हाताला जितके तीळ चिकटतील तितक्या वेळा जरी एखाद्या मुसलमानाने शपथ घेतली तरी त्यावर विश्वास करू नका.” त्याच शिखांवर फाळणीच्या वेळी अनन्वित अत्याचार झाले त्यांना पाकीस्तानातून भारतात पळून यावे लागले. त्याच शिखांच्या पंजाब मधील 13 च्या 13 खासदारांनी वक्फ सुधारणा विधेयकाच्या विरोधात मतदान केले. यात आम आदमी पार्टीचे 3 , शिरोमणि अकाली दलाचा एक आणि बाकी कोंग्रेसी आहेत परंतु सगळ्यांचाच अंतरात्मा मेला आहे , कुणालाही आपला इतिहास ज्ञात नाही आणि म्हणून असे वर्तन करत आहेत.
Comments