top of page
Search

अभिजीत राणे लिहितात,

  • dhadakkamgarunion0
  • 6 days ago
  • 1 min read



अभिजीत राणे लिहितात,

महाराष्ट्रचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे एका वाक्यात वर्णन करायचे असेल तर “भविष्याचा वेध घेणारा द्रष्टा नेता.” असेच करावे लागेल. जातीयवादाने , घराणेशाहीने आणि अहंकाराने पोखरलेल्या महाराष्ट्राच्या राजकारणाला सकारात्मकतेची , ऋजुपणाची आणि भविष्याचा वेध घेऊ शकेल अश्या विकासात्मक योजनांची वाट दाखवणारे नेतृत्व म्हणजे देवेंद्र फडणवीस आहेत. शरद पवार , उद्धव ठाकरे आणि कोंग्रेसी घराणेशाही या अहंकारी , भ्रष्ट आणि स्वार्थलोलुप नेत्यांनी आपली कृष्णकृत्ये दडलेली रहावीत म्हणून सामान्य नागरिकांना जातीयवाद , मराठी अस्मिता , प्रांत वाद या सगळ्या वादांमध्ये कायमच गुंतवून ठेवले. महाराष्ट्राच्या तिजोरीची लूट सुलभ व्हावी म्हणून पुरोगामी महाराष्ट्र , महापुरुषांचा महाराष्ट्र अशी मखलाशी चालू ठेवली. ठाकर्‍यांनी बाळासाहेबांच्या नावाने दुकान चालवले. नावे वेगवेगळी असतील पण या मंडळींनी चक्क दुकानदारी करत नुसती लुटालूट केली आहे. निरपेक्ष, सर्वसमावेशक आणि कुणावरही अन्याय न करणारा ,प्रकल्प बाधितांना रास्त परतफेड देणारा विकास केला जाऊ शकतो हे केवळ आणि केवळ देवेंद्रजींनीच करून दाखवले आहे. या गोष्टीची साक्ष देणार्‍या प्रकल्पांची यादीच आहे. अटल सेतू प्रकल्प,वाढवण बंदर,नवी मुंबई एअरपोर्ट,बुलेट ट्रेन,मल्टिमोडल कॉरिडॉर,कोस्टल रोड,भुयारी मार्ग,मेट्रो प्रकल्प. मुंबई तीनची निर्मिती सुरू असतानाच समांतर पातळीवर मुंबई चार चे काम सुद्धा वाढवण बंदराच्या माध्यमातून वेगाने सुरू होते आहे. महामुंबईसाठी देवाभाऊचे योगदान अफाट आहे. या महाप्रकल्पांना कुठेही निधीची कमतरता पडू दिली जात नाही. आज पासून पाच वर्षांनी ज्यावेळी हे सगळे प्रकल्प पूर्ण झाले असतील त्यावेळी महाराष्ट्र औद्योगिक दृष्ट्‍या संपूर्ण आशियातील अग्रणी स्थान झालेले असेल यात संशय नाही. महाराष्ट्रचे इतर राजकीय नेते महापुरुषांबद्दल बोलतात परंतु कृतीशून्य आहेत. सामान्य लोक घटनांच्या बद्दल बडबड करतात. परंतु देवेंद्रजी हा असा एकमेव नेता आहे जो आकाशाला गवसणी घालणार्‍या संकल्पनांबद्दल बोलतात आणि त्यांच्या पूर्ततेसाठी स्वतःला अक्षरशः झोकून देतात. द्रष्टा हा शब्द देवेन्द्रजींना अत्यंत चपखल लागू होतो. विकसित महाराष्ट्राच्या महामुख्यमंत्र्यांचे आम्ही कार्यकर्ते आहोत याचा आम्हाला अभिमान वाटतो.



 
 
 

Comments


  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page