top of page
Search

 अभिजीत राणे लिहितात

  • dhadakkamgarunion0
  • 6 days ago
  • 4 min read

Updated: 5 days ago

 अभिजीत राणे लिहितात

सर्वोच्च न्यायालयालाच नव्हे तर संपूर्ण न्यायव्यवस्थेला वेसण घालण्याची वेळ आली आहे. न्यायालयांना आपल्या समोरील प्रकरणांवर न्याय देताना ताशेरे मारण्याचा अधिकार आहेच पण तो त्यांनी विवेकाने वापरावा असे अभिप्रेत असते. भ्रष्ट न्यायमूर्तीच्या घरात खोली भरून रक्कम सापडली ते प्रकरण दाबणारे न्यायालय आता राष्ट्रपतींना त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून देणारे टोमणे मारत आहे. राष्ट्रपतींनी विहित कालावधीत निर्णय घेतलाच पाहिजे अशी मुक्ताफळे न्यायालयाने उधळली आहेत. परंतु न्यायमूर्ती महोदय कधीतरी स्वतःच्या अंतर्मनात सुद्धा डोकावून बघत जा की.. मग तुम्हाला कोट्यावधी प्रलंबित केसेस दिसतील. तारीख पे तारीख मुळे रखडवलेल्या याचिका दिसतील. त्यांना बाजूला सारून मध्यरात्री अफजल गुरु या कुत्र्‍याची फाशी वाचवायला सरसावलेले आपलेच व्यवसाय बंधु दिसतील. अजूनही ब्रिटिश पद्धतीने आपली सुरू असलेली सुट्ट्यांची रेलचेल दिसेल. अजूनही आपल्याला मान देण्याचे आणि माय लॉर्ड म्हणून डोक्यावर घेण्याचे हास्यास्पद बंधन दिसेल. परंतु यापैकी काहीही न बघता आपण देशाच्या संवैधानिक प्रमुखावर ताशेरे ओढणार असाल तर सामान्यांचे टोमणे सहन करावेच लागतील आणि तुम्ही यावर काहीही बोलू शकत नाही कारण संविधानाने अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे केवळ भारत तेरे तुकडे होंगे म्हणणार्‍या डफली वाल्यांना दिले नसून आमचाही त्यावर तितकाच अधिकार आहे.

 अभिजीत राणे लिहितात

राष्ट्रवादी कोंग्रेस पार्टी शरद पवार गट हे वारंवार देवेंद्र फडणवीस यांच्या गृहमंत्री म्हणून केलेल्या कार्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत असतात आणि आर आर पाटील हे सर्वात उत्तम गृहमंत्री होते असे कौतुक करत असतात. त्या आर आर पाटलांची ही कर्तुत्व गाथा. 25 ऑगस्ट 2003 लष्कर ए तोयबा कडून मुंबईत तीन बॉम्बस्फोट. 50 मृत्यू आणि 250 हुन अधिक जखमी.11 जुलै 2006 - मुंबई लोकलमध्ये बॉम्बस्फोट. 200 मृत्यू आणि 700 जखमी.26 नोव्हेंबर 2008 - पाकिस्तानी दहशतवाद्यांकडून मुंबईवर हल्ला. 200 मृत्यू आणि 1000 हुन अधिक जखमी.13 फेब्रुवारी 2010 - पुण्यातील जर्मन बेकरीत बॉम्बस्फोट. 20 ठार आणि 50 हुन अधिक जखमी.13 जुलै 2011 - मुंबईत तीन साखळी बॉम्बस्फोट. 20 मृत्यू आणि 100 हुन अधिक जखमी. इतकेच नाही तर रजा अकादमीने दंगल घडवली, महिला पोलिसांचा विनयभंग केला गेला यावेळी सुद्धा गृहमंत्री आर आर पाटीलच होते. या सगळ्या प्रकरणात गुळाचा गणपती सिद्ध झालेल्या व्यक्तीचा कार्यक्षम गृहमंत्री म्हणून गवगवा करणे हा सर्वोच्च कोटीचा विनोद आहे. किंबहुना पवारांच्या लबाडक्यांना मनसोक्त धुडगूस घालता यावा म्हणूनच आर आर पाटील नावाचा निष्क्रिय माणूस या पदावर बसवला होता का ? असाच प्रश्न निर्माण होतो.

 अभिजीत राणे लिहितात

वक्फ (संशोधन) अधिनियम संसदेत मंजूर झाल्यानंतर, मुस्लिम बहुल मुर्शिदाबाद जिल्ह्यात या कायद्याच्या विरोधात मोठ्या प्रमाणावर आंदोलन करण्यात आले. जंगीपूर येथील PWD मैदानावर हजारो लोकांनी एकत्र येऊन राष्ट्रीय महामार्ग 12 वर मोर्चा काढला. पोलिसांनी मोर्चा थांबवण्याचा प्रयत्न केला असता, आंदोलन उग्र झाले. त्यानंतर राष्ट्रीय महामार्ग अडवला गेला. रेल्वे मार्ग अडवला गेला. हिंदूंच्या मालमत्तांवर हल्ले करून जाळण्यास प्रारंभ झाला. एका मिठाईवाल्याला त्याच्या मुलासह जीवंत जाळले , त्याचे दुकान सुद्धा उध्वस्त केले. हे सगळे घडत असताना पोलिसांनी डोळ्यावर कातडे ओढून घेतले होते कारण ममता बांनोला तिच्या मतदारांना दुखवण्याची इच्छा नव्हती. शेवटी कलकत्ता उच्च न्यायालयाने आदेश देऊन केंद्रीय पोलिस दल मागवले आणि त्यांनी येऊन मुर्शिदाबाद इथे शांतता स्थापित केली आहे. मोदीसरकारने आता बोटचेपेपणा बंद करून पश्चिम बंगाल मध्ये राष्ट्रपती राजवट लावणे आवश्यक आहे. तसेही बांग्लादेश वर लष्करी कारवाई करायची वेळ आली तर ममता बानो समर्थन करण्याऐवजी विरोधच करणार आहे त्यामुळे त्यावेळी ती सत्तेत नसेल तरच उत्तम.

 अभिजीत राणे लिहितात

एकीकडे 5 एप्रिलला वक्फ कायदा मंजूर झाला दुसरीकडे 7 तारखेला मुंबईत देवेन्द्र फडणवीस सरकारने आपला होमवर्क पूर्ण करून आता पुढील कारवाईची तयारी सुरू केली. महाराष्ट्रातील 92247 एकरपेक्षा जास्त पसरलेल्या वक्फ जमिनीपैकी 50% पेक्षा जास्त जमिनी या अतिक्रमण केलेल्या जमिनी आहेत याचे लँड-रेकॉर्ड तयार करण्यात आले आहेत.मराठवाड्यात अतिक्रमणाचे प्रमाण 60% आहे, जिथे वक्फ मालमत्तांची संख्या सर्वाधिक आहे. 15877 वक्फ मालमत्ता 57133 एकर जमीन बळकावून बसल्या आहेत, त्यातील 60% जमिनी अतिक्रमण केलेल्या आहेत.फडणवीस सरकारने या जमिनींच्या भू-मॅपिंगसाठी (GIS) निविदा जारी केली आहे. अर्थात, एकदम फुल-प्रूफ आणि फेल-प्रूफ कार्यक्रम होणार आहे. एकही इंच इकडे-तिकडे नाही! मुस्लिम समुदायाच्या कल्याणाच्या नावाखाली राज्यातील काही राजकीय नेत्यांनी वक्फ जमीन कशी बळकावली आणि त्यावर आता ते स्वतःचे साम्राज्य कसे चालवत आहेत याचा पण डेटा तयार आहे. आता या सगळ्या जमिनी मूळ मालक किंवा सरकारच्या ताब्यात येणार असून ही यादी प्रसिद्ध झाल्यावर मुस्लिमांचे कैवारी राजकीय नेते हेच वक्फ जमिनीचे लुटारू असल्याचे जनतेला समजेल. देवा भाऊचा दणका बसल्यावर परत एकदा कोंग्रेसी आणि राष्ट्रवादी वाले कळवळणार आहेत.

 अभिजीत राणे लिहितात

गेले काही दिवस कोंग्रेसचे राजपुत्र राहुल गांधी यांनी जी तिखट आणि अवमानकारक टीका सुरू केली आहे , जातिगत जनगणना करा म्हणून हट्ट धरला आहे. याचे गुपित उलगडले आहे.नॅशनल हेराल्ड नावाच्या वृत्तपत्राच्या एकूण 5000 कोटी रुपयांच्या मालमत्तेचा माय लेकरांनी घोटाळा केला. न्यायालयाच्या आदेशाने नोव्हेंबर २०२३ मध्ये ईडीने दिल्ली, मुंबई आणि लखनौमधील 661 कोटी रुपयांच्या स्थावर मालमत्ता आणि 90.2 कोटी रुपयांचे एजेएल शेअर्स जप्त केले. त्यातीलच 700 कोटी रुपयांच्या मालमत्तेवर जप्तीची प्रक्रिया ईडीने आज सुरू केली आहे. या मालमत्तांमध्ये दिल्ली, मुंबई आणि लखनऊमधील प्रमुख ठिकाणांचा समावेश आहे. दिल्लीतील बहादूर शाह जफर मार्गावरील आयकॉनिक हेराल्ड हाऊस देखील जप्त होणार आहे. 11 एप्रिल रोजी कोर्टाने दिल्ली, मुंबई आणि लखनौ येथील प्रॉपर्टी रजिस्ट्रारना नोटिसा बजावल्या आहेत, जिथे सोनिया आणि राहुल गांधी यांच्या मालकीची कंपनी यंग इंडियन लिमिटेड द्वारे अधिग्रहित केलेल्या असोसिएटेड जर्नल्स लिमिटेडची मालमत्ता आहे.मुंबईतील हेराल्ड हाऊसमधील 'जिंदाल साउथ वेस्ट प्रोजेक्ट्स' यांना भविष्यातील सर्व भाडे थेट ईडीकडे जमा करण्याचे निर्देश कोर्टाकडून देण्यात आले आहेत. थोडक्यात माय लेकरांचे आता अच्छे दिन सुरू झाले आहेत आणि म्हणून थयथयाट सुरू झालाय.







 
 
 

Comentários


  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page