top of page
Search

🖋️ अभिजीत राणे लिहितात

  • dhadakkamgarunion0
  • 5 days ago
  • 3 min read

🖋️ अभिजीत राणे लिहितात

सुधारित वक्फ कायदा हा वास्तवात सामान्य मुस्लिमांच्या हिताचा असून वक्फच्या मालमत्ता बेकायदेशीर रित्या उपभोगणार्‍या मुस्लिम मुल्ला मौलवी आणि राजकीय नेत्यांना वेसण घालणारा आहे. परंतु या संदर्भात शिस्तबद्ध गैरसमज पसरवले जात असून भाजपाने या मुद्द्यावर राष्ट्रीय पातळीवर जनजागरण मोहीम आखणे आवश्यक आहे. काँग्रेस खासदार इम्रान मसूदने वक्फ सुधारणा कायद्याबाबत मोठे विधान केले आहे. आम्ही सत्तेत आलो तर एका तासात वक्फ कायद्यात बदल करणार असल्याची धमकी त्यांनी दिली आहे. यावेळी त्यांनी सांगितलेल्या खोट्या गोष्टी मुस्लिम समुदायाला विचलित करू शकतात. मसूद म्हणाले की, जर मशीद नसेल तर नमाज कुठे पडणार? मरणानंतर प्रेत कुठे दफन करणार? हा खोडसाळ प्रचार आहे पण हा मुद्दमून केला जातो आहे. सरकारने आणि भाजपने याची गंभीर दखल घेणे आवश्यक आहे. कारण वक्फ कायद्याच्या विरोधातच पश्चिम बंगाल मध्ये दंगल घडवली गेली आहे.

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात

हिंदूंच्या हितांचे संरक्षण करणारे विधेयक जॉर्जिया या अमेरिकेतील राज्यात सिनेट मध्ये आणले गेले असून ते पारित झाले आहे. यामुळे आता अमेरिकेतील हिंदूंविरोधात घृणा पसरवणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. "गेल्या काही वर्षांत, देशभरात हिंदूंविरुद्धच्या गुन्ह्यांमध्ये लक्षणीय वाढ झाल्याचे आपल्याला दिसून आले आहे," असे सिनेटर स्टील म्हणाले. हे विधेयक पारित झाल्याने खलिस्तानी आणि इस्लामी नागरिक जोर्जिया मधील हिंदूंना त्रास देऊ शकणार नाहीत. जॉर्जियामध्ये विधेयक पारित झाल्याने आता अमेरिकेच्या इतर राज्यांमध्ये हे विधेयक पारित करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अमेरिकेत याआधी अनेकदा हिंदू आणि त्यांच्या मंदिरांवर हल्ला करण्यात आला आहे आणि अमेरिकेच्या सैन फ्रान्सिस्को आणि न्यूयॉर्कमध्ये खलिस्तान्यांनी हिंदूद्वेषी घोषणाबाजी केली आहे. आता कायद्याचे संरक्षण प्राप्त झाल्याने अश्या पद्धतीने घोषणाबाजी किंवा हल्ला करणार्‍यांना हिंदू नागरिक तक्रार दाखल करू शकतात आणि त्यांना शिक्षा होऊ शकते. केरळ , पश्चिम बंगाल आणि कर्नाटक मधील हिंदूंची अवस्था लक्षात घेता तिथे सुद्धा असे कायदे करावे का ? असा विचार करण्याची वेळ आली आहे.

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात

उदंड जाहले सचिव अशी अवस्था सध्या शिवसेना उबाठा गटाची झाली आहे. पक्षांतर्गत नियोजन शून्य, पण चमकोगिरी अधिक करणाऱ्या माजी खा. विनायक राऊत आणि आदेश बांदेकर यांचे पंख छाटण्यात आले आहेत. ‘उबाठा’ गटात सहाव्या सचिवाची नियुक्ती करीत, प्रस्तापितांना सूचक इशारा देण्यात आला आहे. लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे मानद सचिव सुधीर साळवी यांच्या गळ्यात सचिव पदाची माळ घालण्यात आली आहे. एका पक्षाला तब्बल सहा सचिव असणे ही तशी दुर्मिळ गोष्ट आहे परंतु पाच सचिव पक्ष विस्ताराच्या ऐवजी वैयक्तिक भानगडीत अडकून पडल्यामुळे ते महायुतीला उघड अंगावर घ्यायला तयार नाहीत महणून उद्धव ठाकरे गटाने महापालिका निवडणुका लक्षात घेऊन सुधीर साळवी यांच्या हाती कमान सोपवली आहे. स्वतः उद्धव ठाकरे पायाला भिंगरी लावून फिरत नाहीत , फिरू शकत नाहीत त्यामुळे त्यांना दरबारी पद्धतीने राजकारण करत आपल्या शिलेदारांवर भिस्त ठेवावी लागते आणि शिलेदार जर घोटाळ्यात अडकला तर तो महायुतीला अंगावर घेत नाही हे खरे दुखणे आहे. असो सुधीर भाऊ साळवी बृहन्मुंबई महापालिका राखतील का ? हे बघणे औत्सुक्याचे ठरेल.

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात

मुर्शिदाबाद मध्ये जे घडले ते फाळणीपूर्वी झालेल्या डायरेक्ट अॅक्शन डे प्रमाणे घडले आहे. पोलिस संपूर्णपणे निष्क्रिय होते त्यांना काहीही करू नका अश्या ममताबानोच्या सूचना होत्या. हिंदूंची घरे जाळली गेली , मालमत्ता लुटल्या गेल्या , खून आणि बलात्कार केले गेले, सगळे काही घडले आहे. रेल्वे मार्ग आणि रस्ते अडवले गेले होते. हे सगळे अराजक आणि आक्रोश कलकत्ता उच्च न्यायालयात पोचला आणि म्हणूनच केंद्रीय दल तातडीने नियुक्त करा असा आदेश न्यायालयाला द्यावा लागला आहे. या हिंसाचाराला चिथावणी बांगलादेशातून दिली गेली असल्याचा गुप्तचर यंत्रणांचा दावा आहे. मोहम्मद युनूस हा प्यादा असून सध्या बांगलादेश जमात ए इस्लामी चालवते आहे आणि त्यांना मार्गदर्शन पाकिस्तानी आय एस आय करते आहे. हे सगळे लक्षात घेऊन आता मोदी सरकारने कठोर पावले उचलणे आवश्यक आहे. आम्ही राष्ट्रपति राजवट लादत नाही नावाची नैतिकतेची भूमिका गुंडाळून ठेवून उशिरा का होईना मणीपुर मध्ये राष्ट्रपतींच्या हातात कारभार देण्याची वेळ आलीच आहे. आता पश्चिम बंगाल मध्ये सुद्धा अजून हिंदूंची कत्तल होऊ नये आणि आपल्याच देशात हिंदूंना विस्थापित होण्याची वेळ येऊ नये असे वाटत असेल तर पश्चिम बंगाल मध्ये राष्ट्रपती राजवट लावून ममता बानोला तुरुंगात डांबणे आवश्यक आहे.

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात

महाराष्ट्रातील न्यूज च्यानेल्सच्या खोट्या , खोडसाळ आणि समाज विघातक बातम्या देण्यावर राज्यसरकारने आता कारवाई करण्याची वेळ आलेली आहे अन्यथा हे लोक एखाद्या दिवशी दंगल सुद्धा घडवतील. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा रायगड दौरा झाला. त्यामध्ये ते या राष्ट्रवादी कोंग्रेस पक्ष अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे यांच्या घरी भोजन करायला गेले. तटकरे कुटुंबिय स्वतः शाकाहारी आहे. त्या दिवशी हनुमान जयंती होती त्यामुळे अर्थातच शाकाहारी भोजन प्रबंधच होता. परंतु एबीपी माझा या न्यूज च्यानेल ने जाणीवपूर्वक एक खोटी बातमी चालवली. त्यात अमित शहा यांनी शाकाहारी भोजन केले परंतु तटकरे यांनी अन्य पाहुण्यांसाठी मांसाहारी भोजनाची सुद्धा सोय केली होती असा उल्लेख केला. हनुमान जयंतीच्या दिवशी मांसाहार करणे ही गोष्ट निश्चितच हिंदूंच्या भावना दुखावणारी सिद्ध होते आणि म्हणूनच हा खोडसाळपणा केला गेला. सदरील वार्ताहराला ज्यावेळी विचारणा झाली त्याने शाकाहारीच भोजन होते हे मान्य केले मग मुंबईत बसून ही खोटी बातमी कोणी शिजवली आणि प्रसारित केली याचा शोध घेतला जाऊन संबंधितांना शिक्षा आवश्यक आहे.

🔽







 
 
 

Comments


  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page