top of page
Search

🖋️ अभिजीत राणे लिहितात

  • dhadakkamgarunion0
  • 19 hours ago
  • 3 min read

🖋️ अभिजीत राणे लिहितात

तनिशा भिसे मृत्यू प्रकरणी इंडियन मेडिकल असोसिएशन या डॉक्टरांच्या संस्थेने आपल्या वतीने या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून अहवाल मांडला आहे आणि त्यात त्यांनी डॉक्टर घैसास यांना क्लीन चिट दिले आहे. डॉक्टर घैसास यांची काहीही चूक नाही. त्यांनी महिलेला गर्भधारणेपूर्वी सर्व धोक्यांची जाणीव करून दिली होती. तिने अन्यत्र गर्भधारणा उपचार घेऊन नंतर ती डॉक्टरांच्या कडे आली त्यावेळीही त्यांनी तिला संपूर्ण माहिती दिली होती आणि या जुळ्या बाळांमुळे गर्भधारणा किती धोक्याची आहे याची कल्पना दिली होती. घटना घडली त्या दिवशी सुद्धा त्यांनी एकूण खर्च किती येईल याचा अंदाज सांगितला होता. त्यांनी सकृतदर्शनी कोणत्याही मानकांचा भंग केला आहे असे निदर्शनास येत नाही असे या अहवालात म्हटले आहे. यामुळे मिडिया ट्रायल घेणारे , मुख्यमंत्र्‍यांवर दडपण आणून डॉक्टर घैसास यांच्यावर कारवाई करायला भाग पाडणारे आणि भाजपात बाहेरून येऊन कायदा हातात घेणारे असे सगळेच लोक तोंडघशी पडले आहेत. आता यांच्यापैकी कोण कोण डॉक्टर घैसास यांची माफी मागतील ? हा लाख मोलाचा सवाल आहे.

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात

संजय राऊत यांचा उबाठा गटाचे शिबीर नाशिक मध्ये सुरू होते याची कुणाला सुद्धा खबर नव्हती. कारण संजय राऊत यांचा पक्ष हा आता महाराष्ट्राच्या राजकारणात अदखलपात्र झालेला आहे. त्यामुळे त्यांच्या या शिबिराची वार्ता कुणालाही नव्हती मीडियाने सुद्धा याची दखल घेतली नव्हती. अश्यावेळी राऊत यांनी वादग्रस्त वक्तव्य करून आकर्षणाचे केंद्र होण्याचा परत एकदा प्रयास केला आहे. ठाकरे गटाच्या शिबिरावरचे लक्ष दुसरीकडे जावे म्हणून दर्ग्यावर बुलडोझर चालवायचा हे कसले लक्षण आहे? हिंमत असेल तर समोर येऊन लढा. पंधरा दिवसांपूर्वीच आजच्या करवाईचा मुहूर्त काढला होता. भारतीय जनता पक्षाच्या लोकांचा याबाबतीत कोणीच हात धरू शकणार नाही, असा हल्लबोल केला. भाजप आमदार देवयानी फरांदे यांनी राऊत यांचे बिंग उघड केले. त्या म्हणाल्या की, आजची दर्गा काढण्यात आली त्याचे मी स्वागत करते. गेल्या 25 वर्षांपासून स्थानिक नागरिक त्यासाठी लढा देत होते. 2000 साली ही दर्गा रात्रीतून उभी केली होती, त्याचे अनेक पुरावे नागरिकांनी दिले होते. हायकोर्टाच्या आदेशानंतर आज ही दर्गा हटवण्यात आली. दिशाहीन उबाठा गटाला चर्चेत ठेवण्याचा राऊत यांचा प्रयास स्पृहणीय असला तरी तो दिवसेंदिवस अधिकाधिक केविलवाणा होतो आहे.

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात

घोटाळा कसा करावा ? याचा प्रशिक्षण वर्ग गांधी कुटुंबियांनी सुरू करायला हरकत नाही. सोनिया गांधी आणि राहुल यांनी फक्त 50 लाख रुपये गुंतवले आणि त्यात 5000 कोटींची मालमत्ता हडप केली. रोबर्ट वढेरा जावई आहे पण तो यांच्या चार पावले पुढे निघाला. डी एल एफ या कंपनीशी त्याने संधान बांधले. त्यांच्या कडून हात उसने म्हणून फक्त 3.5 कोटी रुपये घेतले आणि एक शेतजमीन विकत घेतली. तो शेतकरी सुद्धा इतका चांगला की जावई बापू आहेत. त्यांच्याकडून काय पैसे घ्यायचे म्हणून त्याने 3.5 कोटी रूपयांचा चेक कधीच बँकेत भरला नाही. हरियाणाचे तत्कालीन मुख्यमंत्री हुड्डा पण जावईबापूंना नाराज कसे करतील ? त्यामुळे त्यांनी शेतजमिनीला व्यावसायिक परवाने तत्काल देऊन टाकले. मग हीच जमीन डी एल एफ यांनी फक्त 45 कोटी रुपयांना विकत घेतली. इतकेच नाही तर जावईबापू आहेत म्हणून 4 कोटी रुपयांच्या सहा सदनिका पण त्यांनी भेट दिल्या. आता भारतात जावयांचे दशमग्रह म्हणून इतके कौतुक करतातच. पण इडी वाल्यांना ते सहन झाले नाही आणि त्यांनी केस टाकली. आता सासू , मेव्हणा आणि जावई तिघेही बिचारे तुरुंगाच्या वाटेवर आहेत आणि एकट्या प्रियांका दिदीवर सगळे ओझे पडणार आहे.

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात

पोलिसांवर हल्ला ही मुस्लिम दंगेखोरांची नवीन पद्धती असल्याचे उघड होते आहे. पोलिस हे कायद्याचे रक्षक आहेत. पोलिसांवर हात उचलणे हा गंभीर गुन्हा असल्याचे आपल्या दंडविधानात नमूद केले आहे . त्यासाठी कठोर शिक्षा पण आहे. आजवर ओवेसी सारखे मुस्लिमांचे आक्रस्ताळे नेते सुद्धा 15 मिनिट पोलिस को हटा दो अशी भाषा वापरत असत. पोलिसांवर हल्ला करू असे त्यांनी सुद्धा कधी म्हटले नाही. परंतु नागपूर दंगल , कालची नाशिक दंगल आणि बंगाल मधील मुर्शिदाबाद प्रकरण तिन्ही मध्ये हे एक साम्य आहे की पोलिसांवर हल्ले झाले आहेत. प्राणघातक हल्ले झाले आहेत आणि पोलिसांना याचे कठोर प्रत्युत्तर देण्याचे अधिकार आणि संधी जर प्रशासन आणि न्यायालयाने दिली नाही तर यामुळे पोलिसांचे मनोधैर्य खच्ची होऊ शकते याची आपल्याकडील राजकीय नेत्यांनी आणि प्रशासनाने नोंद घेणे आवश्यक आहे.

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात

जस्टीस लोया यांच्या मृत्युचे प्रकरण आठवत असेलच एका थर्ड क्लास मासिकाने हा मृत्यू संशयास्पद असल्याचा दावा केला होता. समस्त पुरोगामी मंडळी या डाव्यावर विश्वास ठेवून सर्वोच्च न्यायालयात गेली आणि हा खून अमित शहा यांनीच घडवला आहे असा दावाही केला. भारतीय माध्यमांच्या इतिहासातलं ते एक अत्यंत अभूतपूर्व पान होतं. सुप्रीम कोर्टाने ते तथाकथित पुरावे टराटरा फाडले. कोर्टाने निव्वळ या मूर्ख बातमीवर विश्वास ठेवायला नकार तर दिलाच, पण शिवाय हा पुरावा ऐकीव असेल तर प्रत्यक्ष त्या प्रसंगांच्या साक्षीदार व्यक्ती कोर्टात साक्ष देण्यास हजर होत्या. लोया एकटेच नव्हते तर ते ज्या लग्नसमारंभात गेले होते त्यात बरोबर सात की आठ न्यायाधीश आणि न्यायमूर्ती होते. त्यातल्या एका न्यायमूर्तींनी सगळा वृत्तांत सांगितला. संपूर्ण प्रकरणात ते लोयांच्या बरोबर होते. लोयांना गाडीतून हॉस्पिटलात तेच घेऊन गेले होते आणि तिकडे सुविधा होत्या. तेंव्हा ऐकीव माहितीवर आधारित याचिका विरुद्ध आपल्याच क्षेत्रातल्या प्रत्यक्षदर्शींची मतं यात अर्थातच कोर्टाने न्यायमूर्तींचं म्हणणं उचलून धरलं.आपल्याच गाडीतून आपण घेऊन गेलो आणि ऍडमिट केलं हा आणि पुढचा समग्र इतिवृत्तांत घडला तसा सांगणारे न्यायमूर्ती होते न्या. भूषण गवई. आज त्यांची देशाच्या सरन्यायाधीशपदी निवड झाली. थोडक्यात एक अत्यंत सत्यवादी आणि निष्पक्ष व्यक्ती आपली सरन्यायाधीश झाली आहे.

🔽
















 
 
 

Comments


  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page