🖋️ अभिजीत राणे लिहितात
- dhadakkamgarunion0
- 9 hours ago
- 3 min read
🖋️ अभिजीत राणे लिहितात
वक्फ बोर्ड सुधारणा कायद्यावर नरेंद्र मोदी सरकारवर सगळीकडून टीका होत असताना एक सुखद हवेची झुळूक या रूपाने दाऊदी बोहरा समाज समोर आला आहे. दाऊदी बोहरा समजाच्या शिष्टमंडळाने काल नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आणि त्यांचे वक्फ सुधारणा कायद्याबद्दल अभिनंदन करून आपले समर्थन घोषित केले. मोदींनी आपल्या इजिप्त दौर्यात दाऊदी बोहऱ्यांसाठी अत्यंत आदराचे स्थान असलेल्या अल-हकीम बि-अम्र अल्लाह मशीदीला भेट दिली होती. दाऊदी बोहरा समुदायाचे 11वे इमाम – इमाम अल-हाकिम बि-अम्र अल्लाह यांचे नाव या मशिदीला असून ही मशिद फातिमी खलीफा साम्राज्याच्या काळात (१०१३ साली) बांधली गेली. या मशिदीला मोदींनी भेट दिल्यामुळे मोदींचे आणि या समाजाचे नाते अधिकच दृढ झाले आणि कठीण प्रसंगी या संपूर्ण समाजाने मोदींना आपले समर्थन दिले आहे ही खूप मोठी गोष्ट आहे. या समुदायाशी बोलताना पंतप्रधानांनी हा कायदा केवळ अल्पसंख्याकांसाठीच नाही तर अल्पसंख्याकांमधील अल्पसंख्याकांसाठी आणला आहे. असे मत मांडून उपस्थितांची मने जिंकली.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
ममता बॅनर्जी या बेकायदेशीर आणि उद्दाम वर्तनाच्या सर्व मर्यादा पार करत आहेत आणि त्यामुळे देशभरातील हिंदूंचा संताप प्रचंड वाढतो आहे. मुर्शिदाबाद दंगल आणि अत्याचारांमुळे भयभीत होऊन 400 कुटुंबांनी पळ काढला आहे. या दंगलग्रस्त भागाला राज्यपालांना भेट द्यायची होती परंतु ममता बॅनर्जी यांनी परवानगी नाकारली. 400 विस्थापित कुटुंबांची मालदा येथे जाऊन भेट घ्यायला आणि त्यांना दिलासा द्यायला जाण्यासाठी ममता बॅनर्जी यांच्या प्रशासनातील एकाही व्यक्तिला , नेत्याला , मंत्र्याला किंवा आमदाराला वेळ नाही. राज्यपालांना जाऊ द्यायची यांची तयारी नाही. इतकेच काय या हिंदू नरसंहाराच्या विरोधात राज्य भाजपावाले कलकत्त्यात मोर्चा काढणार होते त्याला सुद्धा ममता प्रशासनाने परवानगी नाकारली. शेवटी या मंडळींना उच्च न्यायालयात धाव घेऊन मोर्चा काढण्याची परवानगी सुद्धा न्यायालयाकडून मागून घ्यावी लागली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार मात्र काहीही ठोस कारवाई करत नाही ना राष्ट्रपती राजवट लागू करत आहे त्यामुळे हिंदू जनमानस अत्यंत व्यथित झाले आहे.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
मलेशियन कोर्टाकडून आपल्या न्यायालयांनी आणि राजकारणी मंडळींनी शिकण्याची वेळ आली आहे. मलेशियातील एक हिंदू आई लोह सिउ हाँगने तब्बल ८ वर्षे यासाठी लढा दिला आहे. हाँगच्या नकळत तिच्या तीन मुलांचे धर्मांतर केले गेले आणि या विरुद्ध तिने प्रदीर्घ कायदेशीर लढा दिला. दोन्ही पालकांच्या संमतीशिवाय धर्मांतर करणे असंविधानिक असल्याचा न्यायलयाने निकाल दिल्याने या हिंदू मातेला दिलासा मिळाला आहे. मलेशिया हे मुस्लिम बहुल राष्ट्र आहे तरीही न्यायालयाने हिंदू मातेच्या हितांचे संरक्षण करणारा निर्णय दिला आहे. याउलट आपल्या देशात विशेष विवाह कायदा केल्यामुळे हिंदू मुलींना धर्मांतरीत करणारा लव्ह जिहाद मोठ्या प्रमाणात सुरू आहे आणि न्यायालय आणि समस्त राजकीय पक्ष यामुद्द्यावर आपल्या डोळ्यावर कातडे ओढून बसले आहे. नावाला हिंदुत्ववादी असणार्या आपल्या सरकारांना आणि आपल्या हिंदू हिताचा विचार न करणार्या न्यायव्यवस्थेला आरसा दाखवणारा हा निर्णय घेतल्याबद्दल मलेशियन सर्वोच्च न्यायालयाचे अभिनंदन.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
चितळेंनी चितळेंना फसवले ! चितळे बंधु मिठाईवाले हा ब्रॅंड अत्यंत प्रसिद्ध आहे. त्यांची बाकरवडी जगभर प्रसिद्ध आहे. याच प्रसिद्धीचा गैरफायदा चितळे आडनाव असलेल्याच एका मिठाई व्यावसायिकाने घेतला. चितळे स्वीट होम असे या दुकानाचे नाव होते. प्रमोद प्रभाकर चितळे यांनी चितळे हेच नाव वापरुन ऑनलाइन स्वरुपात आणि ऑफलाइन स्वरुपात वापरत आणि आपल्या उत्पादनाचे पॅकिंग चितळे यांच्या पॅकिंगसदृश्य करत विक्री सुरू केली. अनेक ग्राहक या गोष्टीला फसले आणि त्यांनी ही डुप्लीकेट बाकरवडी खरेदी केली. परंतु नेहमीच्या ग्राहकांना चवीतील हा फरक लक्षात आला आणि त्यांनी चितळे बंधु मिठाईवाले यांच्याकडे तक्रार करायला आरंभ केला. चितळे बंधु मिठाईवाले यांनी या संदर्भात चौकशी केल्यावर त्यांना ही फसवणूक ध्यानात आली आणि त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली. नाम साधर्म्याचा असा चुकीचा फायदा घेण्याचा प्रयास प्रमोद प्रभाकर चितळे यांना अंगलट आला आहे. ग्राहकांनी सुद्धा एकंदर अधिक जागृत होऊन खरेदी करणे आवश्यक आहे हे पण या निमित्ताने अधोरेखित झाले आहे.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
अमेरिकेने दहशतवादी तहव्वूर राणाला भारतात जा किंवा पाकिस्तानात हा पर्याय दिला.त्याने विचार केला, "मी पाकिस्तानात गेलो तर मुक्त असेल पण तिथे देशाची अवस्था खराब आहे. वीज कधी जाईल आणि कधी येईल हे सांगता येत नाही. अन्नधान्याचा तुटवडा आहे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे "अज्ञात " मला कधी मारून टाकतील हे सांगता येत नाही. जर मला भारताच्या हवाली केले तर तिथे मला उच्च सुरक्षा असलेल्या तुरुंगात ठेवले जाईल. तुरुंगात कैद्यांना मिळणाऱ्या सर्व सुविधा,हक्क मला मिळतील. कपिल सिब्बल सारखे वकील माझ्या बाजूने खटला लढवतील. मला सर्व प्रकारची कायदेशीर मदत मिळावी यासाठी इंडी आघाडी प्रयत्न करेल. ममता किंवा अखिलेश मला राज्यसभेची जागा देऊ शकतात . कोर्ट मला जामीन मंजूर करेल आणि वरून मानवी हक्क हनन केल्याबद्दल केंद्र सरकारवर ताशेरे ओढले जातील.हा सर्व विचार केल्यावर दहशतवादी तहवर राणा बोलला की...... खड्ड्यात गेला पाकिस्तान..... मी तर भारतातच जाणार. भारत जिंदाबाद! भारतातील पुरोगामी जिंदाबाद!! भारतीय न्याययंत्रणा त्रिवार झिंदाबाद”
🔽





Comentarios