🖋️ अभिजीत राणे लिहितात
- dhadakkamgarunion0
- 9 hours ago
- 3 min read
🖋️ अभिजीत राणे लिहितात
आम आदमी पार्टीचे संयोजक अरविन्द केजरीवाळ म्हणजे एक सामान्य मध्यमवर्गीय माणूस असून त्यांची ओळख म्हणजे निळ्या रंगाच्या छोट्या गाडीत फिरणारा आणि चार खोल्यांमध्ये रहाणारा आणि राष्ट्रहितासाठी तळमळणारा व्यक्ति अशी आहे. अश्याच केजरीवाल यांनी राजकारण शुद्ध आणि भ्रष्टाचारमुक्त करण्याची शपथ घेऊन दिल्लीचे मुख्यमंत्रीपद दहा वर्ष भोगले. या दहा वर्षात त्यांच्या नावावर दारू घोटाळा , नदी सफाई घोटाळा , मोहल्ला क्लिनिक घोटाळा असे आठ ते दहा घोटाळे लागले ज्यात काही हजार कोटींचा भ्रष्टाचार झाला आहे. सरकारी तिजोरीतून त्यांनी पाचशे कोटी रुपये खर्च करून एक शिशमहल बांधला आणि त्यात ते मुख्यमंत्री म्हणून निवास करत होते. त्यांच्या सुकन्या हर्षिता केजरीवाल हिचे लग्न झाले. दहा वर्षाचे मुख्यमंत्री म्हणून मिळालेले पगाराचे उत्पन्न आणि बायकोची नोकरी या बळावर एखादा माणूस किती खर्च करू शकेल ? पन्नास लाख ते एक कोटी. परंतु या शाही विवाहात कमीत कमी पन्नास कोटींचा तरी चुराडा झाल्याचा अंदाज आहे. इतका पैसा केजरीवाल यांच्याकडे कुठून आला हा प्रश्न विचारायचा नाही. हा प्रश्न विचारला की तुम्ही भाजपा एजंट होता. गरीबी हटाव अशी घोषणा देऊन आपली गरीबी हटवण्याची कला कोंग्रेसी नेत्यांनी आत्मसात केली होती पण आयआयटीयन केजरीवाल त्यांच्या शंभरपट पुढचे निघाले हेच खरे.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
कर्नाटक कोंग्रेस सरकारने घटनेच्या मूलभूत तत्वांना आव्हान देणारे मुसलमानांना आरक्षण देणारे विधेयक त्यांच्या विधानसभेत पारित करून घेतले परंतु या विधेयकाला कायद्याचे स्वरूप देण्यास कर्नाटकचे राज्यपाल थावर चंद गेहलोत यांनी नकार दिला असून त्यांनी या संदर्भात राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांनी निर्णय घ्यावा म्हणून त्यांच्या कडे मंजुरीसाठी पाठवले आहे. " भारताचे संविधान धर्माच्या आधारे आरक्षण देण्यास परवानगी देत नाही." हे सत्य माहिती असूनही कोंग्रेसने हा द्राविडी प्राणायाम केला आहे. या विधेयकात कर्नाटक सरकारने विविध सरकारी विभाग, संस्था आणि संस्थांतर्गत येणाऱ्या सर्व सार्वजनिक कामांच्या कंत्राटांपैकी चार टक्के आरक्षण श्रेणी-२ ब अंतर्गत मुस्लीम समुदायासाठी दिलं आहे. २ कोटीपर्यंतचे सरकारी कंत्राट आणि एक कोटीपर्यंतच्या वस्तू व सेवा खरेदी कंत्राटांमध्ये हे आरक्षण असणार आहे. अश्या पद्धतीने आरक्षण देण्याची संविधानात तरतूद नाही.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
कुपुत्र , अमानुष सैतान आजच्या काळात सुद्धा अस्तित्वात असल्याचे दिसल्यावर आपण थिजून जातो. आपले कायद्याचे पुस्तक अश्या हैवानांना शिक्षा देण्यासाठी किती अपुरे आहे याची आपल्याला जाणीव होते. असेच एक प्रकरण कोल्हापुरात उघडकीला आले आहे. कोल्हापूरला एका वस्तीत यलव्वा नावच्या वृद्ध महिलेचा मृतदेह पडला होता. तिचे आतडे , यकृत , हृदय आणि स्तन कापलेले होते. ते मृतदेहाच्या बाजूला पडलेले होते आणि त्याच्या बाजूला बसून तिचा मुलगा सुनील कूचकोरवी मांसासारखे काहीतरी खात होता बाजूला तव्यावर भाजत पण होता. हे दृश्य बघून हदरलेल्या पोलिसांनी त्याला अटक केली आणि कोर्टात खटला दाखल केला. त्याने आपल्याच आईला मारून तिच्या शरीराचे तुकडे भाजून खाल्याचे कबुल केले आहे. न्यायाधीश सुद्धा हे जाणून घेऊन हादरले. कोर्टाने या आरोपीबद्दल भाष्य करताना संगितले की हा तुरुंगात सुद्धा अन्य कैद्यांना मारून खाईल. या माणसाला जगण्याचा अधिकार नाही. आपल्या आईच्या देहाचेच लचके तोडणार्या या नरभक्षक मुलाला फक्त फाशीची शिक्षा देणे ही त्याने केलेल्या गुन्ह्याच्या तुलनेत अत्यंत माफक अशी शिक्षा आहे. त्याला सुळावर चढवणे किंवा जिवंत जाळणे हीच योग्य शिक्षा असू शकेल.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
तनिशा भिसे मृत्यू प्रकरणी महाराष्ट्रातील मीडियाने दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल आणि डॉक्टर्स च्या बदनामीची सुपारी घेतली होती आणि मिडिया ट्रायल घेऊन त्यांनी ती चोख पूर्णत्वाला नेली. परंतु इंडियन मेडिकल असोसिएशन या संस्थेने दिलेल्या अहवालात दीनानाथ मंगेशकर दवाखाना आणि डॉक्टर घैसास निर्दोष आहे असे म्हटले. त्याच प्रमाणे सासून रुग्णालयाने जी समिती नेमली तिने पण निष्पक्ष अहवाल देत या दोघांना सुद्धा क्लीन चिट दिली. कारण गर्भवती स्त्री त्या घटनेच्या दिवसाच्या 5 दिवस आधी पण रुग्णालयात आली होती आणि तिची अवस्था बघून त्यातील गांभीर्य तिला संगितले गेले होते तिने नंतर 5 दिवस इंदिरा आय व्ही एफ मध्ये उपचार घेतले आणि मग ती दीनानाथ मध्ये आली. हा भाग दडवून ठेवला होता. त्याच प्रमाणे नंतर सुद्धा ती ज्या तीन रुग्णालयात गेली होती तिथल्या कार्यशैलीवर सुद्धा ससून मधील डॉक्टरांच्या समितीने ठपका ठेवला आहे. पण या सगळ्यांना वाचवण्यासाठी दीनानाथ रुग्णालयाला बळी देण्याचा प्रयास झाल्याचे आता उघड झाले आहे. आपल्या सुपारीबाज मीडियाचे बिंग आणखी एकदा उघड झाले आहे. पण ते निर्लज्ज असल्याने आणि सरकार यांच्यावर कारवाई करत नसल्याने त्यांना माज आला आहे.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
बृहन्मुंबई महापालिकेत प्रशासक नेमलेला असला तरीही राज्य शासनाचे महापालिकेवर काहीही नियंत्रण नसल्याचे सिद्ध होत आहे. विलेपार्ले भागातील 90 वर्ष जुने असणारे जैन मंदिर तातडीने पाडण्याचा पराक्रम करण्याचे काहीही कारण नव्हते पण बृहन्मुंबई महापालिकेने तो केला आणि खर्या अर्थाने शांतताप्रिय आणि अहिंसक असणार्या जैन समुदायाला एक विराट मोर्चा काढून आपला रोष प्रकट करण्याची वेळ आली. पाडापाडीची कारवाई सुरू केल्यावरच जैन मंडळींनी विरोध केला होता परंतु पोलिसांच्या बळावर हा विरोध चिरडून मंदिर पाडले गेले. मुंबई ही बेकायदेशीर बांधकामांनी अक्षरशः विकृत झालेली आहे. अतिक्रमणांनी मुंबई ग्रासली आहे परंतु या सगळ्या रोहिंग्या आणि बांगलादेशी मुसलमानांच्या अतिक्रमणांवर कारवाई करायचे प्रशासनाचे धाडस नाही. मुसलमान वाट्टेल तिथे कट्टा बनवून हिरवी चादर टाकून अतिक्रमण करतात तिथे एक शब्द बोलायची प्रशासनाची हिम्मत नसते. पण अहिंसक जैन बांधवांवर मात्र लाठ्या काठ्या चालवला यांच्यात जोर येतो. ही मर्दुमकी दाखवणार्या सहाय्यक आयुक्ताची बदली केली गेली आहे याचा निषेध. त्याला निलंबित करणे आवश्यक होते. किंवा त्याला मुस्लिम बहुल अतिक्रमण ग्रस्त भागात नियुक्ती देणे आवश्यक होते जेणेकरून तो किती खरा मर्द आहे हे सुद्धा आपल्याला समजले असते.
🔽





Comments