आग्रा येथे होणार शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक; मुख्यमंत्री फडणवीसांच्या आश्वासनाची पूर्तता
- dhadakkamgarunion0
- Mar 27
- 1 min read
🔏 [ ⏺️ पंचनामा ]
▪️==================▪️
आग्रा येथे होणार शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक; मुख्यमंत्री फडणवीसांच्या आश्वासनाची पूर्तता
● छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीला ३९५ वर्ष पूर्ण झाली आहेत. यानिमित्ताने आग्रा येथे आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारण्याची घोषणा केली होती. फडणवीस म्हणाले होते की, आग्रा शहरात ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांना नजरकैदेत ठेवले होते. ती वास्तू महाराष्ट्र शासनामार्फत अधिगृहीत करून तेथे भव्य स्मारक उभारण्यात येईल. त्यासाठी आवश्यक निधीची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात येईल. या आश्वासनाची पूर्तता करणारा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. या स्मारकासाठी कार्यवाही आणि निधीची जबाबदारी पर्यटन विभागाकडे देण्यात आली असून, यासंदर्भातील शासन निर्णय दि.२१ मार्च रोजी निर्गमित झाला आहे. या ठिकाणी आधुनिक तंत्रज्ञानाने युक्त स्मारक उभारले जाणार आहे. संग्रहालय, दृकश्राव्य कार्यक्रम, माहितीपट आदी उपक्रमांच्या माध्यमातून महाराजांचा जाज्वल्य इतिहास पुढील पिढ्यांसाठी साकारला जाणार आहे.
© -अभिजीत राणे
(दै.मुंबई मित्र/वृत्त मित्र, मराठी/हिंदी)

Comments