आदिवासी युवा आदान प्रदान कार्यक्रमाचे मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन
- dhadakkamgarunion0
- Dec 13, 2024
- 2 min read
धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांची प्रमुख पाहूणे उपस्थिती
मुंबई : गोरेगाव येथील न्यूझीलँड हॉस्टेल येथे नेहरू युवा केंद्र संघटन आयोजित 16वा आदिवासी युवा आदान-प्रदान कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात आणि दिमाखात दिपप्रज्वलन करून संपन्न झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी उपस्थिती लावली तर विशेष अतिथी म्हणून गृह मंत्रालयाच्या अंडर सचिव रमा शौकीन, मुंबईचे उद्योगपती गणपत कोठारी, केंद्रीय लघुउद्योग मंत्रालयाच्या प्रतिनिधी रिटा सिंग आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमात ओडिशा आणि छत्तीसगडमधील कंधमाल, कालाहंडी, सुकमा, नारायणपूर आणि दंतेवाडा या राज्यांतील विविध जिल्ह्यांमधून 83 मुली आणि सुमारे 120 मुलांनी सहभाग घेतला व आपल्या पारिंपारीक नृत्याने मान्यवरांचे सवागत केले.
प्रमुख पाहुणे अभिजीत राणे यांनी यावेळी बोलताना, आदिवासी युवक हे भारताच्या संस्कृतीचे आणि परंपरेचे वाहक आहेत. या कार्यक्रमातून आधुनिक कौशल्ये, शिक्षण आणि रोजगाराच्या संधींचा लाभ घेऊन सक्षम बना व राष्ट्र उभारणीत आपले योगदान द्या. आपण युवक हे भारताच्या भविष्याचा कणा आहात, असे यावेळी ते म्हणाले.
गृह मंत्रालयाच्या अंडर सचिव रमा शौकीन यांनी यावेळी बोलताना केंद्र सरकार आदिवासी समाजाला योजनांच्या सक्षम करण्यासाठी सक्षम करीत आहे. आदिवासी तरुणांना आपल्या देशातील विविध राज्यांची भाषा, जिवनशैली, संस्कृती यांची माहिती मिळणे गरजेचे असून, भविष्यात त्यांना त्याचा आपल्या करिअरच्या दृष्टीकोनातून फायदा करुन घेता येईल. असे यावेळी त्या म्हणाल्या.
उद्योजक गणपत कोठारी यांनी युवकांना स्वावलंबन आणि उद्योजकतेच्या क्षेत्रात नवीन आयाम शोधण्याची प्रेरणा दिली.
केंद्रीय लघुउद्योग मंत्रालयाच्या प्रतिनिधी रीता सिंग यांनी तरुणांना लघु उद्योगांच्या माध्यमातून रोजगार निर्मिती आणि विकासाच्या संधींची माहिती दिली. नेहरू युवा केंद्र संघटनेचे राज्य संचालक प्रकाशकुमार मानुरे यांनी युवकांना सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांची माहिती दिली.
कार्यक्रमात आदिवासी तरुणांनी आपल्या परंपरा आणि संस्कृतीचे सादरीकरण करणारे सांस्कृतिक कार्यक्रम यावेळी सादर केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन जिल्हा युवा अधिकारी संकल्प शुक्ल यांनी केले.
#abhjeetrane #photo #nehruyuvakendra #ministeryofhomeAffairs #TribalYouth #goragaon #dhadak #Inauguration







Comentários