top of page
Search

आपले सरकार’च्या जलद कामासाठी मुख्यमंत्री फडणवीसांचा कठोर निर्णय

  • dhadakkamgarunion0
  • 9 hours ago
  • 1 min read

🔏 [ ⏺️ पंचनामा ]

▪️==================▪️

आपले सरकार’च्या जलद कामासाठी मुख्यमंत्री फडणवीसांचा कठोर निर्णय

● मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये 'आपले सरकार' पोर्टलवरील नागरिकांना मिळणाऱ्या विविध सेवा वेळेत आणि कार्यक्षम पद्धतीने उपलब्ध करुन देण्यावर भर देण्यात आला. फडणवीस यांनी स्पष्ट निर्देश दिले की, सेवा वेळेत न पुरवणाऱ्या संबंधित प्रशासकीय विभाग प्रमुखांवर दररोज १ हजार रूपयांचा दंड आकारण्यात यावा. तसेच, यासंदर्भात मुख्य सचिवांनी तात्काळ परिपत्रक जारी करावे. राज्यात सेवा हक्क अधिनियमांतर्गत एकूण १०२७ सेवा अधिसूचित करण्यात आल्या असून, त्यापैकी ५२७ सेवा सध्या ‘आपले सरकार’ पोर्टलवर कार्यरत आहेत. उर्वरित १३८ सेवा ३१ मे २०२५ पर्यंत आणि राहिलेल्या ३०६ सेवा १५ ऑगस्ट २०२५ पर्यंत ऑनलाईन करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या डिजिटल योजनेच्या अंमलबजावणीसाठी ‘महाआयटी’ला ऑनलाईन प्रक्रियेचे प्रमाणीकरण करण्याचे निर्देशही देण्यात आलेले आहेत.

© -अभिजीत राणे

(दै.मुंबई मित्र/वृत्त मित्र, मराठी/हिंदी)



 
 
 

Comments


  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page