top of page
dhadakkamgarunion0

एका निवडणुकीच्या निर्णयावरून महाराष्ट्रातील जनमत व्यक्त होत नाही.

Updated: Dec 5, 2020

@ABHIJEETRANE(AR)

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आजच्या विधानपरिषद निवडणुकीच्या निकालाचे केलेले विश्लेषण अचुक आहे असे मला वाटते.

ते म्हणाले की:

1) एका निवडणुकीच्या निर्णयावरून महाराष्ट्रातील जनमत व्यक्त होत नाही.

2) पदवीधर आणि शिक्षक विधान परिषदेचे आमदार निवडण्यासाठी मतदार जो जसा विचार करतात तसा तो सरकार बनविण्यासाठी विधानसभा निवडणुकीत मतदान करताना करत नाहीत तिथे भाजपाने 2019 साली 105 जागा मिळवल्या होत्या कारण भाजपाने सत्तेवर यावे ही लोकांची इच्छा होती जी डावलून महाआघाडीने अनैतिक मार्गाने सत्ता मिळवली जे मतदारांना आजही पसंत नाही.

3) महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपा विरूद्ध इतर पक्ष अशी लढत होऊनही बहुसंख्य स्थानिक स्वराज्य संस्था भाजपाने काबीज केल्या हा इतिहास आहे.. आजचा अपवाद वगळता भाजपाचे वर्चस्व अबाधित आहे.

4) आजच शिर्डी नगराध्यक्ष पद भाजपाने जिंकले आहे हे नमूद करायला हवे.

5) शिवसेनेचा एकही उमेदवार निवडून आलेला नाही त्यामुळे भाजपाला प्रश्न विचारण्याचा त्यांना नैतिक अधिकार नाही. महाआघाडीत शिवसेना एकाकी आहे हे यावरून सिद्ध होते.

6) यापुढे भाजपा अधिक सावध संघटितपणे शक्ती प्रदर्शन करीत नेत्रदीपक विजय प्राप्त करील हे दाखवून देऊ.

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज भाजपाची भूमिका स्पष्ट करताना आत्मपरीक्षण आणि आत्मविश्वास यांचा समर्पक अविष्कार सिद्ध केला यात शंकाच नाही!!

www.abhijeetrane.in


5 views0 comments

Comments


bottom of page