कामगार नेते अभिजित राणे यांच्या उपस्थितीत नवक्षितिज ट्रस्टचा वर्धापन दिन आणि जयंती महोत्सव
- dhadakkamgarunion0
- 4 hours ago
- 1 min read
नवक्षितिज चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई आयोजित ट्रस्टचा 10 वा वर्धापन दिन व छत्रपती शिवाजी महाराज व ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती महोत्सव 2025’ धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजित राणे, तत्कालीन जिल्हाधिकारी मुंबई उपनगर जिल्हा निर्मलकुमार देशमुख, शिवसेना उपनेते अमोल कीर्तिकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आदर्श नगर, आरे कॉलनी येथे मोठ्या जल्लोषात पार पडला
अभिजीत राणे यांनी यावेळी बोलताना, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात आणत स्वाभिमान, शौर्य आणि लोकहित याचे अनन्यसाधारण उदाहरण घालून दिले. त्यांचा आदर्श म्हणजे धर्मनिरपेक्षतेचा आणि सामाजिक न्यायाचा खंबीर किल्ला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारताला केवळ संविधान दिलं नाही, तर मानवतेच्या पायावर उभं असलेलं न्याय्य समाजव्यवस्थेचं स्वप्न ही दिलं. त्यांची सामाजिक समतेची चळवळ म्हणजे विचारशील क्रांतीची गगनचुंबी मशाल आहे. अशी प्रतिक्रिया दिली.
#abhijeetrane #DKU #संयुक्तजयंती२०२५ #शिवरायआणिबाबासाहेब #स्वराज्यतेसमता #SwarajyaToSamata #VicharYoddha #शिवजयंती #आंबेडकरजयंती































Yorumlar