कामगारांच्या हक्कांसाठी पुढाकार
- dhadakkamgarunion0
- Apr 9
- 1 min read
कामगारांच्या हक्कांसाठी पुढाकार
महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री सन्मा. आकाश पांडुरंग फुंडकर यांची "धडक कामगार युनियन"चे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी सदिच्छा भेट घेतली व त्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला व महाराष्ट्रातील उद्योगांमध्ये काम करणाऱ्या कामगारांच्या समस्या, त्यांच्या अडचणी आणि त्यावर उपाययोजना यावर सविस्तर सकारात्मक दृष्टीने चर्चा झाली.
अभिजीत राणे यांनी सांगितले की, “कामगार वर्ग हा देशाच्या प्रगतीचा खरा कणा आहे. त्यांच्या अडचणी सोडवणे आणि त्यांना न्याय मिळवून देणे हीच आमची जबाबदारी आहे.”
कामगार मंत्री यांनीही सकारात्मक प्रतिसाद देत या सर्व मुद्द्यांची गांभीर्याने दखल घेतली असून लवकरच ठोस निर्णय घेतले जातील, असे आश्वासन दिले.
ही भेट कामगार हिताच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण टप्पा ठरली असून आगामी काळात अशा अधिकाधिक संवादातून समस्या सोडवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.



Comments