केंद्रीय विधी व न्याय राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) मा. अर्जुन राम मेघवाल यांची भेट
- dhadakkamgarunion0
- 12 hours ago
- 1 min read
केंद्रीय विधी व न्याय राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) मा. अर्जुन राम मेघवाल यांच्याशी धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी धडक कामगार युनियनचे सल्लागार गणपत कोठारी यांच्या समवेत मुंबई छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे स्नेहपूर्ण भेट झाली. त्यांच्या सुस्पष्ट विचारसरणी, लोकशाही मूल्यांबद्दलची बांधिलकी आणि न्यायव्यवस्थेबाबतचे प्रगल्भ दृष्टिकोन यांचं मनापासून कौतुक वाटलं. देशातील विधी व न्याय क्षेत्रातील सुधारणा, डिजिटल परिवर्तन व न्याय सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा दृष्टिकोन अत्यंत प्रेरणादायक आहे. अशा दूरदृष्टी असलेल्या नेतृत्वाशी संवाद साधणं ही खरोखरच एक समृद्ध करणारी अनुभूती होती. अशी प्रतिक्रीया अभिजीत राणे यांनी त्यांच्या भेटी नंतर दिली.
#abhijeetrane #arjunmeghwal #DKU #photo #ArjunRamMeghwal #LawAndJustice #MeetingWithMinister #LeadershipMatters #LegalReforms #InspiringLeadership #GovernmentOfIndia







Comments