गोहत्या प्रकरणात मकोकाअंतर्गत कारवाईचा मुख्यमंत्री फडणवीसांचा निर्णय
- dhadakkamgarunion0
- Mar 27
- 1 min read
🔏 [ ⏺️ पंचनामा ]
▪️==================▪️
गोहत्या प्रकरणात मकोकाअंतर्गत कारवाईचा मुख्यमंत्री फडणवीसांचा निर्णय
● कायद्यानुसार गो हत्या करणे गुन्हा आहे. मात्र गो हत्येचा वारंवार गुन्हा केला जात असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे वारंवार अशा प्रकारचे गुन्हे करणाऱ्यांवर यापुढे संघटित गुन्हेगारी कायद्यानुसार अर्थात मकोकाअंतर्गत कारवाई करण्यात येईल, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. गो तस्करीचे प्रमाण वाढत चालल्याने हे प्रकार रोखण्यासाठी वेगळा कायदा करण्यात यावा, अशी मागणी करण्यात येत आहे. या मागणीवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी गो हत्येचा वारंवार गुन्हा करणाऱ्यांवर मकोकाची कारवाई करण्याचा इशारा दिला. अशा प्रकरणांमध्ये कठोर कारवाई करण्यात येऊन कोणालाही सोडण्यात येणार नाही, असे आश्वासन फडणवीस यांनी दिले आहे. लव्ह जिहाद प्रमाणे गोहत्या, गोतस्करी विरोधात 'मकोका'अंतर्गत कारवाई करा, अशी मागणी सभागृहात करण्यात आली. मुख्यमंत्री फडणवीस यावेळी सभागृहातच उपस्थित असल्याने याची दखल घेत मकोकाअंतर्गत कारवाई करण्याचा निर्णय त्यांनी घोषित केला.
© -अभिजीत राणे
(दै.मुंबई मित्र/वृत्त मित्र, मराठी/हिंदी)

留言