दंगलखोरांची प्रॉपर्टी विकून नुकसान भरपाई वसूल करु; मुख्यमंत्री फडणवीसांचा इशारा
- dhadakkamgarunion0
- Mar 27
- 1 min read
🔏 [ ⏺️ पंचनामा ]
▪️==================▪️
दंगलखोरांची प्रॉपर्टी विकून नुकसान भरपाई वसूल करु; मुख्यमंत्री फडणवीसांचा इशारा
● नागपूरमध्ये झालेल्या हिंसाचाराच्या घटनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस आयुक्तांशी बैठक घेत आढावा घेतला. यावेळी ‘दंगल करणाऱ्या प्रत्येकावर कारवाई होणार, कारवाई होईपर्यंत आम्ही शांत बसणार नाही’, असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला. या हिंसाचारात ज्यांचं नुकसान झालं त्यांना ३ ते ४ दिवसांत नुकसान भरपाई दिली जाईल. आत्ता जे काही नुकसान झालेलं आहे ते सगळं नुकसान दंगेखोरांकडून वसूल करण्यात येईल, दंगेखोरांनी ते पैसे भरले नाहीत तर त्यांची प्रॉपर्टी विकली जाईल, असा थेट इशारा फडणवीसांनी दिला आहे. मोठ्या प्रमाणावर सोशल मिडिया ट्रॅकिंग करुन ज्या लोकांनी दंगल भडकावण्यासाठी चिथावणी दिली, त्यांनाही सहआरोपी केले जाणार आहे.
© -अभिजीत राणे
(दै.मुंबई मित्र/वृत्त मित्र, मराठी/हिंदी)

Comments