top of page
Search

दिल्लीत साहित्य संमेलन होणे अभिमानाची बाब; मुख्यमंत्री फडणवीसांनी व्यक्त केल्या स्वप्न साकार झाल्याच्या भावना फडणवीसांकडून घोषणा

  • dhadakkamgarunion0
  • Feb 25
  • 1 min read

🔏 [ ⏺️ पंचनामा ]

▪️==================▪️


● मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्लीत होणे ही सर्वांसाठी अभिमानाची बाब असल्याचे नमूद करून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, जगभरातील मराठी माणसांचे स्वप्न या निमित्ताने पूर्ण झाले आहे. परकीय आक्रमकांनी आपल्या भाषेला प्रदुषित करण्याचा प्रयत्न केल्यावर शिवाजी महाराजांनी राजकारभारात मराठीचा उपयोग करण्याचा निर्णय केला. सर्व फारसी, ऊर्दु शब्द वगळून मराठीचे शब्द आणण्याची परंपरा त्यांनीच सुरू केली. स्वभाषेचा अभिमान आणि आग्रह छत्रपती शिवाजी महाराजांकडूनच आपण शिकलो आहोत. संमेलन होत असलेल्या तालकटोरा स्टेडिअममध्ये १७३७ मध्ये मराठ्यांनी आपली छावणी लावून दिल्ली जिंकली होती. आता आमचा मराठी माणूस आपल्या विचारांनी दिल्ली जिंकणार आहे.' हे संमेलन ऐतिहासिक ठरणार असल्याचे सांगून १००वे संमेलन भव्य स्वरुपात साजरे करण्यात येईल, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.

© -अभिजीत राणे

(दै.मुंबई मित्र/वृत्त मित्र, मराठी/हिंदी)

 
 
 

Comments


  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page