"दै. मुंबई मित्र/वृत्त मित्र"चे समूह संपादक अभिजीत राणे यांनी आज वसई-विरार शहर महापालिका आयुक्त अनिलकुमार पवार यांची घेतली भेट .
- dhadakkamgarunion0
- Aug 8, 2024
- 1 min read
"दै. मुंबई मित्र/वृत्त मित्र"चे समूह संपादक अभिजीत राणे यांनी आज वसई-विरार शहर महापालिका आयुक्त अनिलकुमार पवार यांची पूर्वनियोजित भेट घेतली.
अभिजीत राणे आणि अनिलकुमार पवार यांच्या मध्ये यावेळी, गेल्या महिन्यात झालेल्या हल्ल्यासंदर्भात चर्चा झाली. "दै. मुंबई मित्र"च्या माध्यमातून अनिलकुमार पवार यांना अभिजीत राणे यांनी गुन्हा दाखल झालेल्या भुमाफीयांच्या बांधकामांवर कारवाई करण्यासंदर्भात निवेदन देण्यात आले. अर्धा तास झालेल्या याचर्चेत भुमाफीयांची मोड्स ऑपरेंडी तसेच राजकारण्यांचा वापर..., कनिष्ठ अधिकाऱ्यांची कशा प्रकारे केली जाणारी गुंतवणूक, अधिकाऱ्यांना केली जाणारी मारहाण आदी विविध विषयांसंदर्भात सकारात्मक दृष्टीकोनातुन अर्धातास सविस्तर चर्चा पार पडली.
अभिजीत राणे यांनी यावेळी त्यांचा शाल व सिंहाची प्रतिकृती देऊन सत्कार केला.









Comentarios