top of page
Search

पवार-ठाकरेंचा विषय मुख्यमंत्री फडणवीस यांनी एका वाक्यात संपवला

  • dhadakkamgarunion0
  • Mar 20
  • 1 min read

🔏 [ ⏺️ पंचनामा ]

▪️==================▪️

पवार-ठाकरेंचा विषय मुख्यमंत्री फडणवीस यांनी एका वाक्यात संपवला

● शरद पवार आणि उद्धव ठाकरे या नेत्यांचे दोन-दोन वाक्यांमध्ये वर्णन करा, असे जयंत पाटील यांनी मुलाखतीदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारले . त्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी एका वाक्यातच हा विषय संपवला. त्यांनी म्हटले की, मी या दोन्ही नेत्यांचे एकाच वाक्यात वर्णन करू इच्छितो आणि ते म्हणजे... ‘काही भरवसा नाही.’ दरम्यान, दोन्ही नेत्यांचे वेगवेगळे वर्णन करा, असे आवाहन जयंत पाटील यांनी केले. मात्र काही भरवसा नाही, या वाक्यातच दोन्ही नेत्यांचे वागणे येते, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले. पक्षफोडीबद्दलही फडणवीस यांनी परखड भूमिका मांडली आहे. ते म्हणाले की, ‘जेव्हा आपण समोरच्याकडे एक बोट करत असतो, तेव्हा आपल्याकडे चार बोटे असतात, हे लक्षात घेतले पाहिजे. समोरच्यांना फोडलेले पक्ष दिसतात, पण चोरलेला जनादेश दिसत नाही. जर २०१९ ला लोकांनी दिलेला निकाल चोरला गेला नसता तर नंतर पक्षफोडीचा विषयच आला नसता आणि आम्ही हे पक्ष फोडलेच नाहीत. या दोन्ही पक्षातील नेत्यांवर त्याच्या पक्षनेतृत्वाने ती वेळ आणली.’

© -अभिजीत राणे

(दै.मुंबई मित्र/वृत्त मित्र, मराठी/हिंदी)

 
 
 

Comments


  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page