पानिपत पराभवाची नव्हे, मराठ्यांच्या शौर्याची लढाई; मुख्यमंत्री फडणवीसांनी ठणकावले
- dhadakkamgarunion0
- Mar 27
- 1 min read
🔏 [ ⏺️ पंचनामा ]
▪️==================▪️
पानिपत पराभवाची नव्हे, मराठ्यांच्या शौर्याची लढाई; मुख्यमंत्री फडणवीसांनी ठणकावले
● पानिपतचे स्मारक म्हणजे पराभवाची आठवण होईल, असा आक्षेप जितेंद्र आव्हाड यांनी घेतला होता. त्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. फडणवीस म्हणाले की, 'पानिपतची लढाई ही मराठ्यांच्या पराभवाची नव्हे, तर शौर्याची लढाई आहे. या ऐतिहासिक लढाईतील त्याग आणि शौर्याची आठवण म्हणून पानिपतच्या काला आंब परिसरात भव्य स्मारक उभारले जाईल.' 'पानिपतच्या लढाईत त्या दिवशी पराभव झाल्याचे शल्य मनात असले तरी आम्ही कधीच हा पराभव मानत नाही. या लढाईतूनच उर्जा घेऊन महादजी शिंदेंनी दिल्ली जिंकली आणि छत्रपती शिवरायांचा भगवा देशभर फडकावला. म्हणूनच पानिपतचे स्मारक हे पराभवाचे नव्हे, तर ते शौर्याचे प्रतिक आहे.' मराठे देशासाठी लढले, म्हणून या स्मारकाची उभारणी झालीच पाहिजे, अशी भूमिका फडणवीस यांनी मांडली आहे आणि दिशाभूल करणाऱ्यांना चांगलेच ठणकावले आहे.
© -अभिजीत राणे
(दै.मुंबई मित्र/वृत्त मित्र, मराठी/हिंदी)

Comments