पीओपी मूर्तींबाबत सरकार सकारात्मक; मुख्यमंत्री फडणवीसांची भूमिका
- dhadakkamgarunion0
- Mar 16
- 1 min read
🔏 [ ⏺️ पंचनामा ]
▪️==================▪️
पीओपी मूर्तींबाबत सरकार सकारात्मक; मुख्यमंत्री फडणवीसांची भूमिका
● पीओपी मूर्तींबाबत सरकार सकारात्मक असून डॉ. अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे. समितीचा अहवाल आल्यानंतर न्यायालयात विनंती याचिका दाखल करू अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. प्रदूषण टाळण्यासाठी पर्यावरण विभागाने पीओपी मूर्तींवर बंदी घातली आहे. परिणामी १३ हजार मूर्तिकार आणि त्यांच्या कुटुंबाच्या पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले की, राज्यात पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा होतो. उच्च आणि सर्वोच्च न्यायालयात राज्य सरकारने हीच भूमिका घेतली आहे. पीओपीवर बंदी घालण्याची भूमिका ही सरकारने नव्हे तर प्रदूषण नियंत्रण महामंडळाने घातली आहे. परंतु, सकारात्मक विचार व्हावा या दृष्टीने डॉ. काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे. तांत्रिक मुद्दा असला तरी प्रदुषण कमी करण्यासंदर्भात विचार व्हावा, याबाबत समितीचा अहवाल आल्यावर त्यावर विचार केला जाईल. तसेच पर्यावरण विभागाकडे मुदत मागितली जाईल. न्यायालयात देखील विनंती याचिका दाखल करू, अशी ग्वाही फडणवीस यांनी दिली आहे.
© -अभिजीत राणे
(दै.मुंबई मित्र/वृत्त मित्र, मराठी/हिंदी)

Yorumlar