पोलिसांचे जीवनमान सुधारण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीसांचे प्रयत्न
- dhadakkamgarunion0
- 10 hours ago
- 1 min read

🔏 [ ⏺️ पंचनामा ]
▪️==================▪️
पोलिसांचे जीवनमान सुधारण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीसांचे प्रयत्न
● मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळ आणि महामंडळाच्या महासंचालक यांचे अभिनंदन केले आहे. फडणवीस म्हणाले की, ‘२४ तास कर्तव्य बजावूनदेखील पूर्वी पोलिसांना अतिशय वाईट अशा खोपट्यासारख्या घरांमध्ये राहण्याची वेळ येत होती. पण महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळाला पोलिसांसाठीची घरे बांधण्याचे काम दिले, तेव्हापासून ते चांगल्याप्रकारचे काम करत आहेत. या माध्यमातून २०१४ नंतर पोलिसांसाठी जास्तीतजास्त घरे बांधण्यासाठी प्रयत्न करण्यात आला. त्यातून पोलिसांचे जीवनमान सुधारले पाहिजे, असा आपला प्रयत्न आहे. तसेच पोलिसांना हक्काची, स्वमालकीची घरे घेता यावी याकरिता डिजिलोनसारखी योजना सुरु करण्यात आली आहे.’
© -अभिजीत राणे
(दै.मुंबई मित्र/वृत्त मित्र, मराठी/हिंदी)
Commenti