top of page
Search

"प्रकृतीशी नातं जपणारा अनोखा उपक्रम – कामगार नेते अभिजीत राणे यांनी दिली भेट"

  • dhadakkamgarunion0
  • 7 hours ago
  • 1 min read

●"जीवदया मंडळाचा उपक्रम आणि कामगार नेते अभिजीत राणे यांचा प्रेरणादायी संदेश" श्री जीवदया मंडळ गोरेगाव - मुंबई द्वारे संचलित मातुश्री संतीबेन करसन मुरजी छेडा (लकडीया) कार्यालय आयोजित "जीव-जंतु आणि कीडे-मकोडे यांना संपूर्ण वर्षभर अन्न पुरवणे" हिंदू पंचांगानुसार चैत्र महिना म्हणजे वसंत ऋतूचा आरंभ - नवे वर्ष, नवे संकल्प आणि निसर्गाच्या नवजीवनाचा उत्सव. या महिन्याला धार्मिक, सांस्कृतिक आणि नैसर्गिक दृष्टिकोनातून फार मोठे महत्त्व आहे. अशा कार्यक्रमास आयोजकांच्या विनंतीस मान देऊन धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी भेट दिली व कार्यक्रमात सहभाग घेतला.

अभिजीत राणे यांनी यावेळी प्रतिक्रीया देताना, आज अशा एका आगळ्यावेगळ्या आणि संवेदनशील उपक्रमाला भेट देण्याचा योग आला, जिथे प्रत्येक सजीवप्रती करुणा ही संकल्पना कृतीत उतरवली जात आहे. "जीव-जंतु आणि कीडे-मकोडे यांना संपूर्ण वर्षभर अन्न पुरवणे" हा उपक्रम केवळ एक सामाजिक जबाबदारी नसून, निसर्गाशी आपलं नातं नव्याने जपण्याचा एक प्रयत्न आहे. या उपक्रमामागील हेतू फक्त जीवांना अन्न देणे इतकाच मर्यादित नाही, तर त्यामध्ये माणसाच्या मनात संवेदनशीलतेचा, सहवेदनेचा आणि शाश्वत पर्यावरणपूरक विचारांचा संदेश दडलेला आहे. आजच्या भेटीत, स्वयंसेवकांची निस्वार्थ सेवा, अन्नाचे व्यवस्थापन, विविध प्रजातींच्या गरजांनुसार केलेली योजना आणि सर्वांगीण विचार पाहून मन भारावून गेले.

खरंच, सजीव आणि निर्जीव यांच्यातील नातं समजून घेणं, हीच खरी मानवतेची ओळख आहे. या प्रेरणादायी कार्यासाठी आयोजक व स्वयंसेवकांचे मनःपूर्वक अभिनंदन! आपणही असे उपक्रम सुरू करून आपल्या परीने निसर्गाचं, सजीवांचं ऋण फेडूया. तसेच श्री माननीय हरिभाई श्रीमान प्रकाश भाई मेहता, जीवदया मंडल गोरेगांव व समस्त जैन समाज सेवा ग्रुप, मालाड यांचे अभिनंदन! अशी प्रतिक्रीया दिली.






































 
 
 

Comments


  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page