फडणवीसांनी कौशल्याने जुळवले जागा वाटपाचे समीकरण
- dhadakkamgarunion0
- Oct 30, 2024
- 1 min read
🔏 [ ⏺️ पंचनामा ]
▪️==================▪️
फडणवीसांनी कौशल्याने जुळवले जागा वाटपाचे समीकरण
■ भाजपाने मनाचा किती मोठेपणा दाखवला आहे, हे या विधानसभा निवडणुकीतील जागा वाटपावरून आपल्या लक्षात येईल. अर्थात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची हे सगळे जमवून आणण्यात महत्त्वाची भूमिका आहे, हे कोणीही नाकारू शकणार नाही. यावेळच्या विधानसभा निवडणुकीत या पक्षातून त्या पक्षात कोलांटउड्या घेण्याचे अनेक प्रकार घडले आहेत. शिंदेसेनेला आणि अजित पवार गटाला महायुतीत जागा तर जास्त हव्या होत्या, पण उमेदवार मिळेनात. भाजपाचे दातृत्व बघा, त्यांनी मित्रांना जागाही दिल्या आणि उमेदवारांचा पुरवठादेखील केला. ज्या जागांवर भाजपाने मित्रांना उमेदवार दिले, त्यातील बहुतेक जागा भाजपाला हव्या होत्या, पण मन मोठे करावे लागले आणि उमेदवारांसह जागा मित्रांना द्याव्या लागल्या. अर्थात हे सगळे प्रत्यक्षात उतरवणे सोपे नव्हते. सहकारी पक्षाला नाराज करायचे नाही आणि स्व: पक्षातील नेत्यांवर अन्याय होऊ द्यायचा नाही, हा समतोल साधण्याचे मोठे जिकरीचे काम फडणवीस यांनी अतिशय कौशल्याने हाताळले आहे.
© -अभिजीत राणे
(दै.मुंबई मित्र/वृत्त मित्र, मराठी/हिंदी)

留言