भाजपा ज्येष्ठ नेते व उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल सन्मा. राम नाईक यांची त्यांच्या परिवारासमवेत कामगार नेते अभिजीत राणे यांनी त्यांच्या गोरेगावयेथील घरी सदिच्छा भेट घेतली. यावेळी नाईक यांच्या मुली विशाखा कुलकर्णी व निशिगंधा नाईक उपस्थित होत्या.
अभिजीत राणे यांचे नाईक परिवाराशी 15 वर्ष जुने संबंध असून, यावेळी राजकीय तसेच त्यांचे अनुभव आदी विविध विषयांवर गप्पा झाल्या. राम नाईक यांनी यावेळी त्यांनी लिहिलेले "कर्मयोद्धा" हे पुस्तक भेट म्हणून दिली. अभिजीत राणे यांनी त्यांचा शाल व सन्मानचिन्ह देऊन सत्कार केला.
Comments