मशिदींवरील भोंग्यांच्या आवाजाला चाप लागणार; मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतली कठोर भूमिका
- dhadakkamgarunion0
- Mar 16
- 1 min read
🔏 [ ⏺️ पंचनामा ]
▪️==================▪️
मशिदींवरील भोंग्यांच्या आवाजाला चाप लागणार; मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतली कठोर भूमिका
● मशिदींवरील भोंग्यामुळे त्रस्त नागरिकांना यापुढे दिलासा मिळेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मशिदींवरील भोंग्यांच्या आवाजाला चाप लावण्याची व्यवस्था केली आहे. यापुढे मशिदींवरील भोंग्यांचा आवाज एका मर्यादेपालिकडे वाढल्यास त्यावर कारवाई करण्याची जबाबदारी संबंधित पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकाची असेल, असे सांगून 'त्याने कारवाई न केल्यास त्या पोलिस निरीक्षकावर कारवाई होईल,' असा इशारा फडणवीस यांनी दिला आहे. पोलिसांना थेट कारवाई करण्याचे फारसे अधिकार नसल्याने संबंधित कायद्यात सुधारणा करण्याबाबत केंद्राशी संपर्क साधण्यात येईल, असे आश्वासनही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले आहे. पोलीस विभागामार्फत सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना जाणीवपूर्वक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आयोजकांवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, तसेच यापुढे ध्वनी प्रदुषणाबाबत तक्रार प्राप्त झाल्यास विनाविलंब तात्काळ कारवाई करण्यात येणार आहे.
© -अभिजीत राणे
(दै.मुंबई मित्र/वृत्त मित्र, मराठी/हिंदी)

Comments