महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचा गुणगौरव पुरस्कार सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न
- dhadakkamgarunion0
- Apr 11
- 2 min read
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ ठाणे व कोकण विभागाच्या वतीने गुणगौरव पुरस्कार सोहळा, पत्रकार मेळावा व आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ठाण्यातील तमाम पत्रकारांनी तसेच नागरिकांनी या सोहळ्यास उपस्थित राहून या सोहळ्याचा आनंद द्विगुणित केला.
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांच्या मार्गदर्शनात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटनेचे प्रदेश संघटक नितीन मनोहर शिंदे यांच्या नियोजनात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर म्हणून विधिमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष दिलीप सपाटे, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष प्रवीण सकपाळे,
ठाणे विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय केळकर,
धडक कामगार युनियनचे संस्थापक विख्यात कामगार नेते तथा मुंबई मित्र वृत्त मित्रचे समूह संपादक अभिजीत राणे, ज्येष्ठ समाजसेवक नानजी भाई ठक्कर, ज्येष्ठ संपादक कैलास महापदी आदी मान्यवर उपस्थित होत, यावेळी कार्यक्रमाचे स्वागतअध्यक्ष म्हणून कोकण व ठाणे विभागाचे सल्लागार प्रमोद इंगळे यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत केले.
महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्ण कृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात झाली.
ठाणेकरांसाठी आयोजित केलेल्या मोफत आरोग्य शिबिरास करता आरोग्य धनसंपदाचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र पाटील यांच्या माध्यमातून विविध प्रकारच्या तपासण्या व अल्प दरामध्ये चष्म्याचे वाटप करण्यात आले, तसेच गुणोत्तरावर पुरस्कार सोहळ्यात विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गुणगौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला या सोहळ्याचे सन्मान मूर्ती म्हणून जिल्हा परिषदेच्या माहिती जनसंपर्कच्या अधिकारी रेश्मा आरोटे, ठाणे महानगरपालिकेच्या शहर विकास विभागाचे अधिकारी कुंदन सूर्यराव, निवृत्त माहिती व जनसंपर्क अधिकारी सुरेखा पाटील, ज्येष्ठ पत्रकार छायाचित्रकार सुभाष जैन, आरोग्य धनसंपदा संस्थेचे अध्यक्ष जितेंद्र पाटील, परिवर्तन महिला व बाल विकास संस्थेचे अध्यक्ष सोनिया गिल, लोकमत वृत्तपत्राचे पत्रकार देवेंद्र जाधव, शूर मराठा चे संपादक गोरखनाथ शिंदे, डेमोक्रेटीक इंडिया पोर्टलचे संचालक अतुल तिवारी, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे माजी ठाणे शहर अध्यक्ष राजन पाटील, सामाजिक सांस्कृतिक राजेंद्र गोसावी, ज्येष्ठ पत्रकार भीमराव शिरसाट, फिजिओथेरपिस्ट डॉक्टर अशोक मेहता, सरपंच रेशमा घरत, मीनाक्षी देशमुख, दिनेश ठाकरे, निखिल भोईर, साम टीव्हीच्या पत्रकार कांचन सोनवणे, युवा उद्योजक रोशन तांडेल वैभव कदम, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे कोकण विभागीय संघटक अरुण बिराजदार, प्रणय शेलार, उत्कृष्ट संबळ वादक यज्ञेश बाबर तसेच ठाणे नागरिक या वृत्तपत्रास गुणगौरव पुरस्कार सोहळ्यास निमित्त मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
त्यावेळी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे ठाणे व कोकण विभागाचे तसेच मुरबाड तालुक्यातील सर्व तालुकाध्यक्ष यांच्या उपस्थितीत गुणगौरव पुरस्कार सोहळा, पत्रकार मेळावा व आरोग्य शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न झाला.













































Comments