मुंबई पूर्व प्रादेशिक विभागाचे अपर पोलीस आयुक्त डॉ. आयपिएस महेश पाटील यांची कामगार नेते अभिजीत राणे यांनी घेतली भेट
- dhadakkamgarunion0
- 12 hours ago
- 1 min read
मुंबई पूर्व प्रादेशिक विभागाचे अपर पोलीस आयुक्त डॉ. आयपिएस महेश पाटील यांची धडक कामगार युनियन चे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी सदिच्छा भेट घेतली. या भेटीत प्रामुख्याने स्थानिक कामगारांच्या समस्या, त्यांच्या सुरक्षिततेच्या बाबी, आणि कामकाजाच्या ठिकाणी येणाऱ्या अडचणी या मुद्द्यांवर सखोल आणि सकारात्मक चर्चा झाली.
महेश पाटील यांनी प्रशासनाच्या वतीने स्थानिक पातळीवर कामगारांच्या कल्याणासाठी सुरु असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली.
या चर्चेच्या माध्यमातून स्थानिक पातळीवर काम करणाऱ्या कामगारांच्या हक्कांचे संरक्षण, कायदा-सुव्यवस्थेचा अंमल आणि सर्वसमावेशक विकास यासाठी प्रशासनाच्या सहकार्याने ठोस पावले उचलण्याचा निर्धार करण्यात आला.
या स्नेहपूर्ण व विचारमंथनात्मक भेटीद्वारे कामगारांच्याहितासाठी एक सकारात्मक दिशा मिळेल असा विश्वास अभिजीत राणे यांनी व्यक्त केला.


Comments