मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली राज्य विकासाच्या वाटेवर
- dhadakkamgarunion0
- 1 day ago
- 1 min read
🔏 [ ⏺️ पंचनामा ]
▪️==================▪️
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली राज्य विकासाच्या वाटेवर
● रायगड जिल्हा आगामी काळात शतप्रतिशत भारतीय जनता पक्षाचा होईल, असा ठाम विश्वास भाजपाचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी व्यक्त केला आहे. शेकापच्या नेत्यांचा भाजपात प्रवेशावेळी ते म्हणाले की, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली देश आणि राज्य विकासाच्या वाटेवर आहे. या नेतृत्वावर विश्वास ठेवूनच माजी आमदार सुभाष पाटील (पंडितशेठ) यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश केला. सुभाष पाटील यांनी सांगितले, ‘मोदी आणि फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सर्वांगीण विकासाची हमी आहे, म्हणूनच आम्ही भाजपात आलो. रायगडच्या विकासासाठी जोमाने काम करून भाजपाला क्रमांक एकचा पक्ष बनवू.’ शेकापमधून अनेक नेते भाजपात येत असल्याने रायगडमधील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे.
© -अभिजीत राणे
(दै.मुंबई मित्र/वृत्त मित्र, मराठी/हिंदी)

Comments