मुख्यमंत्री फडणवीस यांच्या संकल्पनेतील ‘मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम’ पुन्हा सुरू
- dhadakkamgarunion0
- Apr 7
- 1 min read
🔏 [ ⏺️ पंचनामा ]
▪️==================▪️
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या संकल्पनेतील ‘मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम’ पुन्हा सुरू
● राज्यातील तरुणांना सरकारी प्रशासकीय कामकाजाचा अनुभव मिळावा या हेतूने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून ‘मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम’ हा पुन्हा सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत राज्यातील ६० तरुणांची निवड करण्यात येणार असून, त्यांना एक वर्षासाठी जिल्हाधिकारी वा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या अधीन महत्त्वाची जबाबदारी दिली जाईल. तरुणांना प्रशासनासोबत थेट काम करण्याचा अनुभव मिळावा. त्यांच्या ज्ञानाच्या आणि अनुभवाच्या कक्षा विस्ताराव्यात. तसेच त्यांच्या कल्पकतेचा, ताज्या दृष्टिकोनाचा आणि तंत्रज्ञानावरील प्रभुत्वाचा उपयोग प्रशासनाला व्हावा, यासाठी मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. या कार्यक्रमाची अंमलबजावणी नियोजन विभागाच्या अर्थ आणि सांख्यिकी संचालनालयामार्फत होणार आहे.
© -अभिजीत राणे
(दै.मुंबई मित्र/वृत्त मित्र, मराठी/हिंदी)

Comments