top of page
Search

मुख्यमंत्री सहायता निधी कक्षातून गरजू रुग्णांना मोठा दिलासा

  • dhadakkamgarunion0
  • Apr 2
  • 1 min read

🔏 [ ⏺ पंचनामा ]

▪==================▪

मुख्यमंत्री सहायता निधी कक्षातून गरजू रुग्णांना मोठा दिलासा

● मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाच्या माध्यमातून गरजू रुग्णांना उपचारांसाठी मदत मिळत आहे. या मदतीमुळे अनेक रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांचे संकट हलके होत असल्याचे मत लाभार्थी व्यक्त करत आहेत. राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरजू रुग्णांसाठी मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर अर्थसहाय्य दिले जात आहे. मार्च महिन्यात या कक्षामार्फत २,५१७ रुग्णांना तब्बल २२ कोटींहून अधिक मदत करण्यात आली. त्यात मेंदू विकारांवरील उपचारांसाठी सर्वाधिक मदत वितरीत करण्यात आली. मार्च महिन्यात मेंदू विकारांवरील उपचारांसाठी ४७१ रुग्णांना, कर्करोग उपचारांसाठी ४२१ रुग्णांना, हिप रिप्लेसमेंटसाठी ३०६ रुग्णांना, अपघातातील शस्त्रक्रियेसाठी २४७ रुग्णांना, हृदयविकार उपचारांसाठी २३९ रुग्णांना, अपघातग्रस्त १८४ रुग्णांना, नी रिप्लेसमेंटसाठी १५० रुग्णांना आणि बालरोग उपचारांसाठी १४५ रुग्णांना आर्थिक मदत मिळाली.

© -अभिजीत राणे

(दै.मुंबई मित्र/वृत्त मित्र, मराठी/हिंदी)



 
 
 

留言


  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page