मेक इन महाराष्ट्राला मिळणार चालना; मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत सामंजस्य करार
- dhadakkamgarunion0
- 7 days ago
- 1 min read
🔏 [ ⏺️ पंचनामा ]
▪️==================▪️
मेक इन महाराष्ट्राला मिळणार चालना; मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत सामंजस्य करार
● मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महानिर्मिती आणि रशियाच्या रोसातोम कंपनीमध्ये थोरियम इंधनावर आधारित स्मॉल मॉड्युलर रिऍक्टरच्या विकासासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली. या करारानुसार महाराष्ट्रात थोरियम अणुभट्टीचा संयुक्त विकास, अणुऊर्जा नियामक मंडळाच्या सुरक्षा निकषांनुसार त्याचे व्यावसायिकीकरण, तसेच ‘मेक इन महाराष्ट्र’ उपक्रमांतर्गत थोरियम अणुभट्टीसाठी असेंब्ली लाईनची स्थापना केली जाणार आहे. हा उपक्रम भारत सरकार व अणुऊर्जा नियामक मंडळाच्या मार्गदर्शक तत्वांनुसार राबवला जाणार असून, महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन (मित्रा) हे धोरणात्मक पाठबळ देतील. यासाठी विशेष संयुक्त कार्यगट स्थापन करण्यात येणार असून, महानिर्मिती, मित्रा, रशियाची रोसातोम आणि ग्लोबल टेक्नॉलॉजी अलायन्स या संस्थांच्या प्रतिनिधींचा यात सहभाग राहणार आहे.
© -अभिजीत राणे
(दै.मुंबई मित्र/वृत्त मित्र, मराठी/हिंदी)
Commentaires