मोगली संस्कृतीचा संदर्भ देत मुख्यमंत्री फडणवीसांची संजय राऊतांना चपराक
- dhadakkamgarunion0
- Apr 2
- 1 min read
[ पंचनामा ]
==================
मोगली संस्कृतीचा संदर्भ देत मुख्यमंत्री फडणवीसांची संजय राऊतांना चपराक
● मोदींचा पुढचा वारसदार महाराष्ट्रातून असेल असे वक्तव्य संजय राऊत यांनी केले होते. त्यावर प्रतिक्रया देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ‘मोदीजींचा उत्तराधिकारी शोधण्याचे कोणतेही कारण नाही. ते अजून बरेच वर्ष काम करणार आहेत. आ

मचा सगळ्यांचा आग्रह आहे. २०२९ चे पंतप्रधान म्हणून आम्ही मोदीजींकडे बघतो आहोत. त्यामुळे आता अशी चर्चा करणे योग्य होणार नाही. भारतीय संस्कृतीत वडील जिवंत असताना मुलांचा विचार होत नाही. ही सगळी मोगली संस्कृती आहे. वडील जिवंत असताना मुलं असा विचार करतात. त्यामुळे आता कोणाचाही उत्तराधिकारी निवडण्याची वेळ आली नाही. जोपर्यंत माझा विषय आहे, माझा त्याच्याशी संबंध नाही, असे त्यांनी म्हटले.
© -अभिजीत राणे
(दै.मुंबई मित्र/वृत्त मित्र, मराठी/हिंदी)
Comentários