मोफत घरांबरोबर आता वीजही मोफत; मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा
- dhadakkamgarunion0
- Feb 25
- 1 min read
🔏 [ ⏺️ पंचनामा ]
▪️==================▪️
मोफत घरांबरोबर आता वीजही मोफत; मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा
● देशातील प्रत्येक कुटुंबाला हक्काचे घर मिळावे यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रयत्नशील आहेत. वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून राज्य सरकारदेखील हक्काच्या घरांसाठी प्रयत्न करत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. त्यांनी सांगितले की, ‘पंतप्रधान योजनेच्या पहिल्या टप्प्यात महाराष्ट्राला १३ लाख ५७ हजार घरे मिळाली. दुसऱ्या टप्प्यात २० लाख घरे राज्याला देण्यात आली. या घरांच्या बांधणीसाठी आतापर्यंत वेगवेगळ्या माध्यमातून १ लाख ६० हजार रुपयांची रक्कम मिळत होती. मात्र, यामध्ये ५० हजार रुपयांची वाढ करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे. पंतप्रधान आवास योजनेतील घरांमध्ये मोफत वीजदेखील मिळाली पाहिजे, यासाठी राज्य सरकारकडून सौर ऊर्जा प्रकल्प लावले जातील, त्यासाठी अनुदान दिले जाईल. यामुळे आयुष्यभर लाभार्थ्यांना वीज मोफत उपलब्ध होईल,' असे त्यांनी सांगितले. 'या योजनेच्या माध्यमातून बांधल्या जाणाऱ्या घरांवर आमची भगिनी, वहिनीचे नाव असले पाहिजे,' अशी सूचनाही त्यांनी लाभार्थ्यांना केली आहे.
© -अभिजीत राणे
(दै.मुंबई मित्र/वृत्त मित्र, मराठी/हिंदी)

Comments