येत्या दोन वर्षांत तुळजापूरचा कायापालट होईल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची ग्वाही
- dhadakkamgarunion0
- Mar 31
- 1 min read
🔏 [ ⏺️ पंचनामा ]
▪️==================▪️
येत्या दोन वर्षांत तुळजापूरचा कायापालट होईल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची ग्वाही
● बहुचर्चित पंढरपूर कॉरिडॉरसाठी येत्या तीन महिन्यांत जागा अधिग्रहणाचे काम सुरू करण्यात येणार असून, तसा आदेश जिल्हा प्रशासनाला देण्यात आला आहे,’ अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. ‘कॉरिडॉरचे काम सुरू करण्यापूर्वी दुकानदार आणि घर जागामालकांशी लोकप्रतिनिधी चर्चा करतील, चर्चेतून योग्य तो मार्ग निघेल, यात तीळमात्र शंका नाही. सर्वांत फायदेशीर असा मार्ग दुकानदार आणि जागामालकांसाठी काढला जाईल,’ असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. ‘तुळजापूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्याला सरकारने तत्त्वत: मान्यता दिली आहेच. एक हजार ८६६ कोटी रुपयांच्या या आराखड्यातील महत्त्वाच्या कामांना तातडीने निधीही वितरित केला जाईल. पुढील दोन वर्षांत तुळजापूरचा कायापालट होईल,’ अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
© -अभिजीत राणे
(दै.मुंबई मित्र/वृत्त मित्र, मराठी/हिंदी)

Comments