top of page
Search

रसिक भैय्याजी महासंघाच्या श्रीमदभागवत कथेला कामगार नेते अभिजीत राणे यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती

  • dhadakkamgarunion0
  • 4 days ago
  • 1 min read

गोरेगावमध्ये सुरू असलेल्या रसिक भैय्याजी महाराज यांच्या श्रीमदभागवत कथा या प्रवचनाला धडक कामगार युनियन चे संस्थापक महासचिव विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांनी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहून बाललीला, ब्रम्हामोह, गोवर्धन जन्म या कथामृतांचा लाभ घेतला. यावेळी त्यांच्या सोबत ज्येष्ठ पत्रकार कमलेश वैष्णव उपस्थित होते.

गोरेगाव (पश्चिम) येथील शहीद भगतसिंग नगर, नंबर 1 स्थित अण्णाभाऊ साठे मैदानावर, 9 एप्रिल ते 17 एप्रिल 2025 दरम्यान श्रीमदभागवत कथा सप्ताहाचे महिला शक्ती समितीद्वारे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहामध्ये सुप्रसिद्ध प्रवचनकार रसिक भैय्याजी महाराज यांच्या श्रीमुखातून प्रवचन सुरू आहे. दररोज दुपारी साडेतीन ते साडेसात दरम्यान सुरू असलेल्या या प्रवचनामध्ये आतापर्यंत वेदी पूजन, कलश यात्रा, भागवत चर्चा, भागवत महात्म्य, परीक्षित जन्म, शुकदेव आगमन, कपिल अवतार, सती प्रसंग, नरसिंह अवतार, वामन अवतार, रामावतार, कृष्णजन्म, बाललीला, ब्रह्मा मोह, गोवर्धन जन्म व हे कथा भाग पार पडले आहेत. तर महाराश कंस वध, रुक्मिणी विवाह, सुदामा चरित्र, परीक्षित मोक्ष, भगवत पूजा हे कथा भाग होणार आहेत. सप्ताहाच्या अंतिम दिवशी 17 एप्रिल 2025 रोजी व्यासपूजा, हवन, भंडारा, भजन सध्या संपन्न होणार आहे.

सदर कार्यक्रमाचे आयोजन महिला शक्ती समिती द्वारे करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी मीरा रामू काका, कमला परशुराम दुबे यांचे विशेष सहकार्य लाभले असून, सुजित सिंह ठाकूर, संदीप दुबे, संतोष चौहान, वीरेंद्र प्रताप यादव, राजन तिवारी यांचेही सहकार्य लाभले आहे. रसिक भैय्याजी महाराज यांच्या श्रीमुखातून प्रवचनाचा लाभ घेण्यासाठी भाविकांची अलोट गर्दी लोटत आहे.

#धार्मिककार्यक्रम #भक्ति_मार्ग #श्रीमदभागवतकथा #रसिकभैय्याजीमहासंघ #AbhijeetRane












 
 
 

Comments


  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page