रिक्षा चालक व वाहतूक पोलीस बैठकीस कामगार नेते अभिजीत राणे यांची प्रमुख उपस्थिती
- dhadakkamgarunion0
- 6 days ago
- 1 min read
रिक्षा चालकांच्या वाहतूक पोलीस ठाण्यासंदर्भात असलेल्या विविध समस्यांसंदर्भात आरे कॉलनी येथील म्हाडाच्या आरे जीमनॅशियम अँड ऍक्टिव्हीटी सेंटर येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास धडक ऑटो रिक्षा टॅक्सी चालक मालक युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी उपस्थिती लावली व रिक्षा चालकांच्या समस्या मांडल्या. यावेळी दिंडोशी वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील यादव उपस्थित होते. धडक ऑटो रिक्षा टॅक्सी चालक मालक युनियनच्या माध्यमातून यावेळी मुंबई उपाध्यक्ष रहीम शेख, सुबेदार विश्वकर्मा, सय्यद शेख, असलम शेख, मनोज तावडे आदी प्रतिनिधी व विविध युनियनचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
रिक्षा चालकांच्या तक्रारी आणि पोलिसांची कारवाई यामध्ये समतोल साधणे आवश्यक आहे. रिक्षा चालकांनी नियमांचे पालन करणे आणि पोलिसांनी कारवाई करताना पारदर्शकता आणि न्याय सुनिश्चित करणे गरजेचे आहे. यासाठी दोन्ही पक्षांमध्ये संवाद आणि समन्वय वाढवणे उपयुक्त ठरेल. असे अभिजीत राणे यांनी बोलताना सांगितले.




























Comments