वक्फ संशोधन विधेयकावरून मुख्यमंत्री फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल
- dhadakkamgarunion0
- Apr 6
- 1 min read
🔏 [ ⏺️ पंचनामा ]
▪️==================▪️
वक्फ संशोधन विधेयकावरून मुख्यमंत्री फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल
● मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वक्फ संशोधन विधेयकावर प्रतिक्रिया देताना विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ते म्हणाले की, ‘वक्फ बिलातून सेक्युलर शब्दाचा प्रत्यय पाहिला मिळत आहे. मुस्लिम महिलांना वक्फ बोर्डात स्थान मिळणार आहे. हे विधेयक कुठल्याही समाजाच्या विरोधात नाही. धार्मिक आस्थांच्या विरोधातही हे विधेयक नाही. मागच्या बीलामध्ये ज्या चुका होत्या, त्यामुळे जमिनी लाटल्या जात होत्या. आता ज्याची - ज्याची सदविवेकबुद्धी जागृत आहे ते या विधेयकांचं स्वागत करतील.’ विरोधक या संदर्भातील एकही पुरावा संसदीय समितीपुढे आणू शकले नाहीत, जेव्हा काहीही उरत नाही त्यावेळी अशा गोष्टी मांडल्या जातात. विरोधकांनी छातीवर हात ठेवून विचार केला तर लक्षात येईल की विरोधी पक्ष मताची लाचारी असल्यामुळे विरोध करत आहेत. मताच्या लांगुनचालनासाठी हे बिलाला विरोध करत आहेत असेही फडणवीस यांनी म्हटले आहे.
© -अभिजीत राणे
(दै.मुंबई मित्र/वृत्त मित्र, मराठी/हिंदी)

Comments